युद्धाची व्याप्ती वाढल्यास आर्मेनियाला सहकार्य करण्याचे रशियाचे आश्वासन

युद्धाची व्याप्ती वाढल्यास आर्मेनियाला सहकार्य करण्याचे रशियाचे आश्वासन

येरेवान/मॉस्को/बाकु – सध्या आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढल्यास रशिया आर्मेनियाला सर्व प्रकारचे आवश्यक सहकार्य पुरवेल, असे आश्वासन रशियाने दिले आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पत्र लिहून संरक्षण सहकार्याची मागणी केली होती. त्यात तुर्कीकडून अझरबैजानला उघडपणे होणाऱ्या सहाय्याचा उल्लेख करून १९९७ साली रशिया व आर्मेनिया मध्ये झालेल्या कराराची आठवण करून देण्यात आली आहे. रशिया व आर्मेनियामधील या संभाव्य सहकार्यावर अझरबैजानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, तिसऱ्या देशाने आमच्या संघर्षात सहभागी होण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.

रशियाचे आश्वासन

२७ सप्टेंबरपासून मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजान या देशांमध्ये युद्ध भडकले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आवाहनानंतरही दोन्ही देशांच्या नेत्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. संघर्षबंदीच्या प्रयत्नांनंतर युद्ध अधिकच पेटल्याचे समोर येत आहे. अझरबैजानच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तुर्कीने घेतलेली आक्रमक भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.

रशियाचे आश्वासन

गेल्या दोन आठवड्यात अझरबैजानने ‘नागोर्नो-कॅराबख’ प्रांतातील तसेच त्याभोवतीचा काही भाग ताब्यात घेतल्याचे मानले जाते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या युद्धात या देशाला काही अंशी आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. ही आघाडी वाढविण्याच्या प्रयत्नात अझरबैजान तुर्कीच्या सहाय्याने आर्मेनियावर हल्ला करण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी रशियाला संरक्षण सहकार्याची आठवण करून दिल्याचे दिसत आहे.

रशियाचे आश्वासन

रशिया व आर्मेनियामध्ये संरक्षण करार असून, त्यानुसार रशिया आर्मेनियाला शस्त्रपुरवठा करू शकतो. आर्मेनियात रशियाचा संरक्षणतळ असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे आर्मेनिया रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्वाचा देश ठरतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यापूर्वीही आर्मेनियाला सहकार्य देण्याची ग्वाही दिली असली तरी, संघर्ष आर्मेनियाच्या सीमेत पोहोचला तरच रशिया त्यात उतरेल, असे स्पष्ट केले होते.

यापूर्वी १९९१ ते १९९४ या कालावधीत आर्मेनिया-अझरबैजान झालेल्या युद्धात जवळपास ३० हजार जणांचा बळी गेला होता. तर २०१६ साली झालेल्या युद्धात २०० हून अधिक जण ठार झाले होते. या दोन्ही युद्धात रशियाने आर्मेनियाला लष्करी सहकार्य पुरविले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info