रशियाकडून ‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी

रशियाकडून ‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी

मॉस्को – रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्त्वाखाली ‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी घेतल्याची माहिती रशियन लष्कराने दिली आहे. याअंतर्गत पाणबुडी, भूमिगत तळ व ‘बॉम्बर्स’वरून आण्विक क्षमता असणारी क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली, असे सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच रशियाने नवी ‘न्यूक्लिअर डिटरंट पॉलिसी’ जाहीर करून अण्वस्त्रांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पारंपारिक प्रकारे केलेल्या हल्ल्याला अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ही चाचणी महत्त्वाची मानली जाते.

‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी, क्षेपणास्त्रे प्रक्षेपित, व्लादिमिर पुतिन, रशियन लष्कर, कराराचे नूतनीकरण, रशिया, अमेरिका, न्यू स्टार्ट ट्रिटी, TWW, Third World War

रशियाच्या लष्कराने बुधवारी ‘न्यूक्लिअर ट्रायड’च्या चाचणीची माहिती देणारे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर फोर्सेस’च्या तुकड्यांनी यात सहभाग घेतला होता. ‘बॅरेन्ट्स सी’मधील ‘डेल्टा क्लास4’ आण्विक पाणबुडी ‘करेलिया’मधून आंतखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. ‘प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम’मधील भूमिगत तळावरून आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. तर रशियाच्या ‘टीयु-95’ व ‘टीयु-160’ या बॉम्बर्सनी दीर्घ पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा यशस्वी मारा केल्याची माहिती देण्यात आली. ही चाचणी ‘एन्गेल्स’ व ‘युक्रैन्का’ तळावरून घेण्यात आली आहे.

‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी, क्षेपणास्त्रे प्रक्षेपित, व्लादिमिर पुतिन, रशियन लष्कर, कराराचे नूतनीकरण, रशिया, अमेरिका, न्यू स्टार्ट ट्रिटी, TWW, Third World War

या सर्व चाचण्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कमांडखाली झाल्या असून सर्व चाचण्यांनी नियोजित उद्दिष्टे पूर्ण केल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्याच महिन्यात रशियाने ‘अँटी सॅटेलाईट वेपन’सह प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. एकामागोमाग होणाऱ्या या चाचण्या रशियाच्या आक्रमक संरक्षण धोरणाचे संकेत देणाऱ्या ठरतात.

‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी, क्षेपणास्त्रे प्रक्षेपित, व्लादिमिर पुतिन, रशियन लष्कर, कराराचे नूतनीकरण, रशिया, अमेरिका, न्यू स्टार्ट ट्रिटी, TWW, Third World War

रशियाचे हे नवे धोरण अमेरिकेकडून गेल्या काही वर्षात संरक्षण सज्जतेसाठी सुरु असलेल्या आक्रमक हालचालींचा परिणाम असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने रशियाचा सीमेनजिक उभ्या केलेल्या ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स’, सातत्याने वाढत असलेली लष्करी तैनाती, आणि ‘स्पेस बेस्ड वेपन्स’ रशियासाठी मोठे धोके असल्याचे रशियाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने केलेल्या ‘एसएम-3’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवरही रशियाने टीकास्त्र सोडले होते.

गेल्या दोन वर्षात रशियाकडून सातत्याने प्रगत अण्वस्त्रे तसेच क्षेपणास्त्रांच्या आधुनिक आवृत्त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेबरोबरील ‘आयएनएफ’ हा क्षेपणास्त्र करार तुटल्यानंतर या चाचण्यांना अधिकच वेग आला आहे. पुढील वर्षी अमेरिका व रशियामध्ये असणाऱ्या ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ची मुदत संपत आहे. त्यापूर्वी या कराराचे नूतनीकरण करण्यास उत्सुक असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. मात्र अमेरिकेत होणारा संभाव्य सत्ताबदल पाहता रशिया या मुद्यावर आग्रही भूमिका घेऊ शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info