तालिबान पाकिस्तानी लष्कराच्या इशार्‍यावर काम करीत आहे – अफगाणी वर्तमानपत्राचा आरोप

आरोप

काबुल – पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेकडून मिळणार्‍या आदेशांची तालिबानचे दहशतवादी अंमलबजावणी करतात. तालिबानचे नेते बिनधास्तपणे पाकिस्तानमध्ये संचार करतात आणि आपल्या कारवायांसाठी उघडपणे निधी गोळा करतात, असा आरोप अफगाणिस्तानच्या वर्तमानपत्राने केला.

अफगाणिस्तान अशांत ठेवणे, संघर्ष भडकवित राहून अफगाणिस्तानाला स्थीर सरकार मिळू न देणे, हा पाकिस्तानच्या धोरणांचा भाग असल्याचा ठपका काबुल टाईम्स या अफगाणी वर्तमानपत्राने केला. अफगाणिस्तान स्थैर्य हवे असेल तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले भाग आहे, असा दावा या वर्तमानपत्राने केला आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/taliban-is-acting-on-a-tip-off-from-the-pakistani-military/