चीनला घेरण्यासाठी अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील संरक्षणतळांचा विस्तार करणार

- ऑस्ट्रेलिया, गुआम व पॅसिफिक आयलंड्सचा समावेश

चीनला घेरण्यासाठी

वॉशिंग्टन – इंडो-पॅसिफिक क्षेत्रात वर्चस्ववादी कारवाया करणार्‍या चीनला घेरण्यासाठी अमेरिकेने आक्रमक पावले उचलण्याचे संकेत दिले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सादर केलेल्या ‘ग्लोबल पोश्‍चर रिव्ह्यू’मधील शिफारसी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वीकारल्याची माहिती ‘पेंटॅगॉन’च्या अधिकार्‍यांनी दिली. त्यानुसार ऑस्ट्रेलिया तसेच गुआममधील संरक्षणतळांचा विस्तार करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील लष्करी तैनाती वाढविण्यात येणार असून पॅसिफिक आयलंड्सवर संरक्षण विभागासाठी अतिरिक्त सुविधा उभारण्यात येणार आहेत. दक्षिण कोरियात ‘अटॅक हेलिकॉप्टर स्क्वाड्रन’ तैनात करण्यास मान्यता दिल्याचे पेंटॅगॉनने स्पष्ट केले.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय तैनाती व संरक्षणक्षमतेच्या पुनरावलोकनाचे संकेत दिले होते. त्या आधारावर ‘ग्लोबल पोश्‍चर रिव्ह्यू’ संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांना सादर करण्यात आला होता. ऑस्टिन यांनी शिफारशींसह हा अहवाल राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना पाठविला होता. बायडेन यांनी यातील शिफारशी मान्य केल्याची माहिती ‘पेंटॅगॉन’च्या वरिष्ठ अधिकारी डॉ. मारा कार्लिन यांनी दिली.

चीनला घेरण्यासाठी

संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी चीन हे अमेरिकेसमोरचे प्रमुख आव्हान असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे नव्या अहवालात चीनला प्राधान्य देऊन नवे तळ तसेच वाढीव तैनातीची आखणी करण्यात आली असल्याचे कार्लिन यांनी सांगितले. ‘चीनला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया व गुआममध्ये असलेल्या संरक्षणतळांचा विस्तार करण्यात येईल. ऑस्ट्रेलियातील लढाऊ विमानांची तैनाती तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यात येणार आहे. पॅसिफिक क्षेत्रातील बेटांवर संरक्षणविभागासाठी अतिरिक्त सुविधा उभारण्यात येतील. दक्षिण कोरियात अटॅक हेलिकॉप्टर स्क्वाड्रन तैनात होेणार असून आर्टिलरी डिव्हिजनचे मुख्यालय स्थापन केले जाईल’, असे संरक्षण विभागाच्या डेप्युटी अंडरसेक्रेटरी मारा कार्लिन यांनी सांगितले.

चीनला घेरण्यासाठी

याव्यतिरिक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबर लष्करी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीही पावले उचलण्यात येणार आहेत. या क्षेत्रात संरक्षण विभाग अनेक उपक्रम राबविणार असून त्यातील काही गोपनीय असून सहकारी देशांबरोबर बोलणी सुरू आहेत, असे कार्लिन यांनी नमूद केले. जगाच्या इतर भागांमधील अमेरिकी तैनाती कमी करून इंडो-पॅसिफिक क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची शिफारसही ‘ग्लोबल पोश्‍चर रिव्ह्यू’मध्ये करण्यात आल्याकडेे पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांनी लक्ष वेधले.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या नव्या अहवालावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे लष्करीकरण हे अमेरिकेचे खरे उद्दिष्ट असल्याचे पेंटॅगॉनच्या अहवालातून उघड झाले. कोणत्याही परिस्थितीत चीनला घेरून रोखण्याचे अमेरिकेचे इरादे दिसत आहेत’, अशी टीका चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी केली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info