अमेरिका-ब्रिटनला रशिया व युरोपमध्ये युद्ध पेटवायचे आहे

- रशियन परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

मॉस्को – सध्या रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष अधिकच भडकवून त्याचे रशिया विरुद्ध युरोप युद्धात रुपांतर व्हावे, अशी अमेरिका व ब्रिटनची इच्छा असल्याचा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. अमेरिका व ब्रिटनला जर्मनी, पोलंड तसेच बाल्टिक देश साथ देत असल्याचा आरोपही लॅव्हरोव्ह यांनी केला. रशियाबरोबर कोणत्याही प्रकारचा शांतीकरार होऊ नये यासाठी पाश्चिमात्य देश प्रयत्न करीत असल्याचा दावाही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे.

रशिया वरशियन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी पाश्चिमात्य देशांवर जबर टीकास्त्र सोडले. ‘अमेरिका व ब्रिटन फक्त त्यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. रशिया-युक्रेन संघर्षात युरोपिय महासंघातील देशांंना जबर किंमत मोजावी लागत आहे. रशियाबरोबरील तणाव वाढविण्यासाठी अमेरिकेकडून सुरू असलेल्या कारवाया बेजबाबदारपणाचे निदर्शक आहे. ते अतिशय धोकादायक खेळ खेळत आहेत’, या शब्दात रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी पाश्चिमात्य देशांना लक्ष्य केले.

यावेळी लॅव्हरोव्ह यांनी रशियाची युक्रेनमधील मोहीम आता फक्त डोन्बासपुरती मर्यादित नसल्याचे संकेत दिले. ‘मार्च महिन्यात आम्ही तत्कालिन परिस्थितीनुसार युक्रेनचा शांतीप्रस्ताव स्वीकारण्यास तयार होतो. मात्र आता भौगोलिक स्थिती बदलली आहे. आता रशियाची मोहीम फक्त डोनेत्स्क किंवा लुहान्स्कपुरती मर्यादित नाही. झॅपोरिझिआ, खेर्सन यांच्यासह युक्रेनच्या इतर भागांचाही त्यात समावेश आहे. ही प्रक्रिया पुढे सुरू राहिल’, अशा शब्दात लॅव्हरोव्ह यांनी रशियाची लष्करी उद्दिष्टे बदलल्याची जाणीव करून दिली. युक्रेनच्या क्षेत्रातून रशियन भूभागाला कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही, याची काळजी रशिया घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info