Breaking News

सिरियात 24 तासात दुसरा मोठा हल्ला

हिजबुल्लाहचा होम्समधील लष्करी तळ लक्ष्य

दमास्कस – सिरियाच्या पश्‍चिमेकडील होम्स भागात गुरुवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा तळ उद्ध्वस्त झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारली नसली तरी या हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक सिरियन माध्यमे करीत आहेत. गेल्या २४ तासात सिरियात झालेला हा दुसरा मोठा हल्ला असून बुधवारी इराकच्या सीमेजवळ अमेरिकेने चढविलेल्या हल्ल्यात इराण समर्थक १२ जवान ठार झाले होते.

होम्स

सिरियन राजधानी दमास्कसजवळ असलेल्या होम्समधील ‘दाबा’ या लष्करी हवाईतळावर गुरुवारी रात्री सहा क्षेपणास्त्रे हल्ले झाले. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये दाबा हवाईतळ तसेच आसपासचा भाग नष्ट झाल्याचा दावा मानवाधिकार संघटना करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून या हवाईतळावर हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी ताबा घेतला होता. त्यामुळे या हवाईतळावरील हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असण्याची शक्यता मानवाधिकार संघटनेने व्यक्त केली.

इस्रायली लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ‘दाबा’ किंवा ‘अल-कुसैर’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या हवाईतळावर याआधी १० मे रोजी इस्रायली लढाऊ विमानांनी हल्ले चढविले होते. दोन आठवड्यांपूर्वी इस्रायली लष्कराने सिरियातील इराणच्या लष्करी तळांवर ६०हून अधिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. यामध्ये सदर हवाईतळाचा समावेश होता.

दरम्यान, गुरुवारी रात्री दाबा हवाईतळावर झालेले हल्ले आपल्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने भेदल्याचा दावा सिरियन सरकार करीत आहे.

English हिंदी
 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/1000376347112308742
https://www.facebook.com/WW3Info/posts/398450353896788