Breaking News

पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता न दिल्यास पॅलेस्टिनी संख्याबळाने इस्रायल नष्ट करतील – पॅलेस्टिनी पंतप्रधानांचा इशारा

रामल्ला – ‘वेस्ट बँक, गाझापट्टीतील पॅलेस्टिनींची जनसंख्या इस्रायलींपेक्षा वाढली आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता न दिल्यास इस्रायलला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ज्यू राष्ट्र म्हणून इस्रायल आपले अस्तित्व गमावून बसेल’, अशी धमकी पॅलेस्टाईनचे पंतप्रधान ‘मोहम्मद शतायेह’ यांनी दिली आहे. याबरोबरच इस्रायल-पॅलेस्टाईनचा वाद सोडविण्यासाठी अमेरिकेने दिलेला प्रस्ताव धुडकावून पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांनी यावर सडकून टीका
केली आहे.

पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता, इशारा, मोहम्मद शतायेह, इस्रायल-पॅलेस्टाईन वाद, समर्थन देण्याचे आवाहन, पॅलेस्टाईन, इस्रायलवेस्ट बँकमधील पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्रायलबरोबरच्या सर्व करारातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. पॅलेस्टिनी प्रशासनाने यावर अंमलबजावणी सुरू केली असून स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी अरब-आखाती तसेच जगभरातील मित्रदेशांचे सहकार्य मिळविण्यासाठी पॅलेस्टिनी नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान शतायेह यांनी जॉर्डनला भेट देऊन स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी समर्थन देण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान शतायेह यांनी इस्रायलला धमकावले.

‘१९४८ सालानंतर पहिल्यांदाच जनसंख्येच्या बळावर पॅलेस्टाईन इस्रायलपेक्षा वरचढ ठरला आहे. पॅलेस्टिनींसाठी हा मोठा विजय असून जॉर्डनच्या नदीपासून ते भूमध्य समुद्रापर्यंतचा भूभाग ६८ लाख पॅलेस्टिनींनी व्यापलेला आहे. यापैकी वेस्ट बँकमधील ३० लाख, गाझापट्टीत २० लाख आणि इस्रायलमध्ये १८ लाख अशारितीने पॅलेस्टिनी विखुरलेले आहेत. त्यामुळे चारही बाजूंनी इस्रायल पॅलेस्टिनींनी घेरलेला आहे. याच्या तुलनेत इस्रायलींची जनसंख्या ६६ लाख इतकी असून पॅलेस्टिनींपेक्षा दोन लाखांनी कमी आहेत’, याची आठवण शतायेह यांनी करून दिली.

पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता, इशारा, मोहम्मद शतायेह, इस्रायल-पॅलेस्टाईन वाद, समर्थन देण्याचे आवाहन, पॅलेस्टाईन, इस्रायलपॅलेस्टिनींच्या या वाढलेल्या संख्याबळाचा दाखला देऊन पंतप्रधान शतायेह यांनी इस्रायलला बजावले. ‘इस्रायलने पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, अन्यथा पॅलेस्टिनींचे संख्याबळ इस्रायलला नष्ट करील. हे संख्याबळ इस्रायलला ज्यू राष्ट्र किंवा लोकशाही समर्थक राष्ट्र राहू देणार नाही. इस्रायलला देखील वर्णद्वेषी राजवटीचा सामना करावा लागेल आणि इस्रायल शांतता गमावून बसेल’, अशी धमकी पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांनी दिली.

पुढच्या काही वर्षात पॅलेस्टिनींची जनसंख्या वाढणार असून इस्रायलने वेळीच निर्णय घ्यावा, असे पंतप्रधान शतायेह यांनी बजावले. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतीचर्चेसाठी नियुक्त केलेले विशेष दूत जेसन ग्रीनब्लाट यांच्यावरही शतायेह यांनी ताशेरे ओढले. ‘पूर्व जेरूसलेम’वरील पॅलेस्टिनींचे अधिकार नाकारून ग्रीनब्लाट यांनी इस्रायलधार्जिणा शांतीप्रस्ताव तयार केल्याचा आरोप शतायेह यांनी केला.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info