Breaking News

इराणने अमेरिकेने दिलेला अणुकराराचा प्रस्ताव न स्वीकारल्यास युद्ध होणारच

अणुकरार प्रस्तावइस्रायलच्या गुप्तचरमंत्र्यांचा इशारा

जेरूसलेम – ‘अमेरिकेने दिलेल्या अणुकराराच्या नव्या प्रस्तावाला होकार देऊन इराण शरण आला नाही तर अमेरिका, पाश्‍चिमात्य आणि अरब देशांची इराणविरोधात लष्करी आघाडी उभी राहिल’, असा इशारा इस्रायलचे गुप्तचरमंत्री एस्रायल कात्झ यांनी दिला. काही तासांपूर्वीच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनी यांनी संवर्धित युरेनिअमची संख्या वाढविण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कात्झ यांनी इराणला हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

इस्रायलचे पंतप्रधान इराणविरोधी समर्थन मिळविण्यासाठी युरोपिय देशांच्या दौर्‍यावर आहेत. इराणबरोबरच्या अणुकरारावर ठाम राहून युरोपिय देशांना काही प्राप्त होणार नसल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू ठासून सांगत आहेत. त्याचवेळी या अणुकराराच्या आड इराण अणुकार्यक्रम चालवित असल्याचा आरोपही इस्रायली पंतप्रधानांनी केला आहे. इराणचा हा अणुकार्यक्रम आणि सिरियातील लष्करी हालचाली रोखण्यासाठी इस्रायल सौदी अरेबिया व इतर अरब देशांचे सहाय्य घेऊ शकतो, असे संकेतही इस्रायली पंतप्रधानांनी आपल्या जर्मनीच्या दौर्‍यात दिले होते.

इस्रायलचे गुप्तचरमंत्री कात्झ यांनी इराणला इशारा देतानाही अरब देशांबरोबरच्या सहकार्याचा उल्लेख करून इराणविरोधात मोठी लष्करी आघाडी उघडण्याचे ठणकावले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/1004728200537128960
https://www.facebook.com/WW3Info/posts/402307570177733