Breaking News

‘नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट – नाफ्टा’ रद्द करून अमेरिका व मेक्सिकोमध्ये नवा द्विपक्षीय व्यापार करार

वॉशिंग्टन/मेक्सिको सिटी – अमेरिका-कॅनडा-मेक्सिको या तीन देशांमध्ये तब्बल २४ वर्षांपूर्वी झालेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट’ अर्थात ‘नाफ्टा’ करार अखेर मोडीत निघाला आहे. सोमवारी अमेरिका व मेक्सिकोमध्ये नवा द्विपक्षीय व्यापारी करार झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ‘नाफ्टा’चा सदस्य असणार्‍या कॅनडाला वगळून केलेल्या या करारानंतर, ट्रम्प यांनी कॅनडावर अतिरिक्त कर लादण्याची धमकी देऊन खळबळ उडवली आहे.

फ्री ट्रेड, अ‍ॅग्रीमेंट, नाफ्टा, कॅनडा, टीकास्त्र, WW3, अमेरिका, मेक्सिको, पोलाद

अमेरिकेतील कामगारवर्गाला उद्ध्वस्त करणारा तसेच जगाच्या इतिहासातील सर्वात वाईट करार अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘नाफ्टा’ करारावर टीकास्त्र सोडले होते. सत्तेवर आल्यापासून सातत्याने ट्रम्प यांनी ‘नाफ्टा’विरोधात वक्तव्य करीत या कराराला भवितव्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी ‘नाफ्टा’त सहभागी असणार्‍या कॅनडा व मेक्सिको या दोन्ही देशांबरोबर स्वतंत्र वाटाघाटी करण्याचे आश्‍वासनही दिले होते.

त्यातील मेक्सिकोबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींना यश मिळाल्याचे सोमवारी ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेवरून स्पष्ट झाले. ‘पूर्वी या कराराला नाफ्टा असे नाव होते, मात्र आता या नावापासून मुक्ती मिळणार आहे. नव्या कराराचे नाव अमेरिका-मेक्सिको ट्रेड अ‍ॅग्रीमेंट असे राहिल. अमेरिकेतील उद्योजक व शेतकर्‍यांसाठी यात विशेष तरतुदी आहेत. हा अमेरिकेसाठी खूपच चांगला करार आहे’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेक्सिकोबरोबर व्यापारी करार झाल्याचे जाहीर केले.

नव्या करारात, दोन्ही देशांच्या कृषी उत्पादनांवरील कर शून्यावर आणण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये होणार्‍या व्यापारातील गाड्यांचे ७५ टक्के भाग संबंधित देशात तयार झालेले असणार आहेत. त्याचवेळी यातील ४० ते ४५ टक्के भाग तयार करणार्‍या कामगारांचे किमान वेतन १६ डॉलर्स प्रति तास असावे, अशी अट घालण्यात आली आहे. अमेरिकेत तयार होणार्‍या पोलाद, अ‍ॅल्युमिनिअम, ग्लास व प्लास्टिकचा वापर वाढविण्याची तरतूदही करारात आहे.

या करारावर अमेरिका व मेक्सिको दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी कॅनडाबरोबर चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर आयात कर लावणे सोपे आहे, असे वक्तव्य करून खळबळ उडवली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info