9/11 व ‘रॅन्समवेअर सायबरहल्ल्यांचे आव्हान एकसारखे – ‘एफबीआय’च्या प्रमुखांचा दावा

9/11 व ‘रॅन्समवेअर सायबरहल्ल्यांचे आव्हान एकसारखे – ‘एफबीआय’च्या प्रमुखांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेत झालेला 9/11चा दहशतवादी हल्ला व आता अमेरिकेवर होणारे सायबरहल्ले यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी निर्माण झालेली आव्हाने जवळपास सारखीच आहेत, असा दावा ‘एफबीआय’च्या (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) प्रमुखांनी केला. दोन्ही हल्ल्यांमुळे सामान्य अमेरिकी जनतेला मोठ्या उलथापालथींना सामोेरे जाण्याची वेळ ओढावली, याकडे ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेतील सायबरसुरक्षा तज्ज्ञांनी भविष्यात होणारा सायबरहल्ला 9/11 इतकाच भयंकर असेल, असा इशारा दिला होता.

अमेरिकेत9/11 terror attack, Ransomware cyberattacks, एफबीआय गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ एक मोठे सायबरहल्ले होत आहेत. यात मायक्रोसॉफ्ट, सोलरविंड्स, फायरआयसारख्या आघाडीच्या कंपन्यांपासून महत्त्वाच्या सरकारी यंत्रणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात अमेरिकेत ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचेही समोर आले आहे. मे महिन्यात अमेरिकेतील सर्वात मोठी इंधनवाहिनी कंपनी ‘कोलोनिअल पाईपलाईन’ला सायबरहल्ल्याचे लक्ष्य बनविण्यात आले होते.

 

Read more:  http://newscast-pratyaksha.com/marathi/fbi-director-sees-parallels-between-ransomware-attack-and-9-11-terrorist-attacks/