आर्क्टिकमधील वाढती स्पर्धा युद्धास कारणीभूत ठरेल – रशियन संरक्षणमंत्र्यांचा इशारा

आर्क्टिकमधील वाढती स्पर्धा युद्धास कारणीभूत ठरेल – रशियन संरक्षणमंत्र्यांचा इशारा

मॉस्को – भौगोलिक स्थान, नैसर्गिक साधनसंपत्तीचे स्रोत आणि लष्करी तसेच सामरिक हितसंबंध यामुळे आर्क्टिक क्षेत्राकडे अनेक देशांचे लक्ष वेधले गेले आहे. आर्क्टिकमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असून त्यातून युद्ध भडकण्याची शक्यता आहे, असा इशारा रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी दिला. रशियाच्या राजधानीत नुकतीच संरक्षणविभागाची एक बैठक झाली असून या बैठकीत शोईगु यांनी रशियाकडून आर्क्टिक क्षेत्रात प्रगत संरक्षण यंत्रणांची चाचणी घेत असल्याचीही माहिती दिली.

आर्क्टिक, युद्ध, सर्जेई शोईगु, संरक्षणमंत्री, तैनात, WW3, Russia, US, चीनरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मार्च महिन्यात देशाला उद्देशून केलेल्या भाषणात रशियन संरक्षणदलाच्या आर्क्टिकमधील सामर्थ्याचा विशेष उल्लेख केला होता. आर्क्टिकमध्ये रशिया विज्ञान-संशोधन, वाहतूक यासारख्या विविध क्षेत्रात पायाभूत सुविधांची उभारणी करीत असून लष्करी तळांची उभारणी व प्रगत शस्त्रांची तैनाती यावरही भर देणार असल्याची ग्वाही दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी आर्क्टिकमधील रशियाच्या वाढत्या संरक्षणसामर्थ्याचा उल्लेख केला.

‘आर्क्टिक भागात सक्रिय असणार्‍या रशियाच्या नॉर्दन फ्लीटमध्ये नुकतीच ऍडमिरल गोर्शकोव्ह ही विनाशिका, इल्यामुरोमेट्स ही आईसब्रेकर शिप यासह पाच जहाजांचा समावेश करण्यात आला. वर्षाच्या अखेरपर्यंत नॉर्दन फ्लीटमध्ये पाच युद्धनौका, पाच सप्लाय शिप्स, १५ विमाने, ६२ रडार स्टेशन्स व मिसाईल रडार कॉम्प्लेक्स सामील करून घेण्यात येतील. यामुळे आर्क्टिकमधील आरमारी तळाचे ५५ टक्क्यांहून अधिक आधुनिकीकरण पूर्ण झालेले असेल’, अशा शब्दात रशियन संरक्षणमंत्र्यांनी आर्क्टिकमध्ये रशियाकडून सुरू असलेल्या हालचालींकडे लक्ष वेधले.

आर्क्टिक, युद्ध, सर्जेई शोईगु, संरक्षणमंत्री, तैनात, WW3, Russia, US, चीनत्याचवेळी आर्क्टिक क्षेत्राचा भाग असलेले इतर देशही आपल्या हालचालींना वेग देत असल्याचा दावा त्यांनी केला. रशियाव्यतिरिक्त अमेरिका, चीन, जर्मनी, स्वीडन, दक्षिण कोरिया यासारख्या देशांनी त्यांच्या ताफ्यात ‘आईसब्रेकर शिप्स’चा समावेश केल्याची माहिती शोईगु यांनी दिली. रशियन संरक्षणमंत्री इतर देशांच्या तयारीकडे लक्ष वेधत असतानाच अमेरिकेनेही ‘आर्क्टिक’मधील सज्जतेकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेत नुकत्याच मंजूर झालेल्या संरक्षण विभागाच्या बजेटमध्ये, आर्क्टिक क्षेत्रासाठी सहा नव्या ‘पोलर क्लास आईसब्रेकर्स’च्या तैनातीला मान्यता देण्यात आली आहे. या बजेटच्या मंजुरीनंतर अमेरिकेच्या संरक्षणविभागाकडून आर्क्टिकमधील संभाव्य धोरणाबाबत एका उच्चस्तरिय परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. ‘द आर्क्टिक मेरिटाईम सिम्पॉसिअम’ या तीन दिवसांच्या परिषदेत अमेरिकेच्या अमेरिकेच्या वायुसेनेच्या ‘नॉर्दन कमांड’चे प्रमुख तसेच ‘एअरस्पेस कमांड’चे वरिष्ठ अधिकारी जनरल ‘टेरेन्स ओशॉग्नेसी’ व ‘अलास्का कमांड’चे प्रमुख जनरल केनेथ विल्सबाक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘रशियासाठी आर्क्टिक हा समोरची आघाडी आहे, घरामागचे अंगण नाही, हे ध्यानात ठेवायला हवे. अलास्कामुळे अमेरिका हादेखील आर्क्टिकचा भाग असणारा देश आहे. त्यामुळे या भागात प्रगत व आधुनिक संरक्षणयंत्रणांची तैनाती करणे आवश्यक ठरते’, अशा शब्दात जनरल ‘टेरेन्स ओशॉग्नेसी’ यांनी नजिकच्या काळात अमेरिकेकडून आर्क्टिकमधील लष्करी हालचाली वाढविण्याचे संकेत दिले.

यावर्षाच्या सुरुवातीलाच चीनने आर्क्टिक क्षेत्रातील संभाव्य धोरणाचा समावेश असणारी ‘श्‍वेतपत्रिका’ प्रसिद्ध करताना ‘पोलर सिल्क रोड’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info