Breaking News

निर्वासितांच्या विरोधात मध्य युरोपिय देशांमध्ये सशस्त्र दलांची उभारणी – स्लोवेनियात राष्ट्राध्यक्षपदाचे माजी उमेदवार सशस्त्र दलाचे प्रमुख असल्याचा स्थानिक यंत्रणांचा दावा

प्राग – जर्मनीच्या ‘केमनिटझ्’ शहरात निर्वासितांविरोधात झालेल्या आंदोलनामुळे आणीबाणीची घोषणा होत असतानाच, युरोपच्या इतर भागांमध्येही निर्वासितांविरोधातील असंतोष तीव्र झाल्याचे समोर येत आहे. पूर्व तसेच मध्य युरोपचा भाग असलेल्या काही देशांमध्ये निर्वासितांविरोधात सशस्त्र गट स्थापन करण्यात आले आहेत. स्थानिक गुप्तचर व सुरक्षायंत्रणांनी या घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

सशस्त्र दल, उभारणी, स्लोव्हेनिया, स्टॅजर्स्का गार्ड, निर्वासित, प्रशिक्षण, ww3, युरोप, प्राग, नाईट वोल्व्हज्युरोपमध्ये 2015 सालापासून निर्वासितांचे अवैध लोंढे धडकत असून आतापर्यंत सुमारे 20 लाखांहून अधिक निर्वासित दाखल झाल्याचे सांगण्यात येते. या निर्वासितांना सामावून घेण्यात युरोप सपशेल अपयशी ठरला असून निर्वासितांमुळे युरोपिय देशांची सुरक्षा तसेच सामाजिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. युरोपातील काही देशांनी निर्वासितांना उघडपणे स्वीकारण्याची भूमिका घेतली असली, तरी त्याला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून बहुतांश युरोपिय देशांमधून असंतोषाची भावना प्रखर होऊ लागली आहे.

आफ्रिका व आशियाई देशांमधून आलेले हे निर्वासित खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. यामुळे युरोपिय देशांमधील जनता खवळली असून जनमत निर्वासितांच्या विरोधात गेले आहे. म्हणूनच युरोपात गेल्या दोन वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये निर्वासितांना विरोध करणार्‍या उजव्या व राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करणार्‍या पक्ष व संघटनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही देशांमध्ये या गटांनी सत्ता मिळविण्यातही यश मिळविले आहे. या पार्श्‍वभूमीवर सशस्त्र दलांची झालेली उभारणी लक्ष वेधून घेणारी घटना ठरते.

झेक रिपब्लिक व स्लोव्हेनियात निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या गटांनी सशस्त्र दलांची उभारणी केली असून त्यांच्या सदस्यांची संख्या पाच हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ‘झेक रिपब्लिक’ची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा असणार्‍या ‘बीआयएस’ने नुकताच यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून त्यातील काही माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आली. ‘झेक रिपब्लिक’मध्ये ‘नॅशनल होम गार्ड’ नावाच्या सशस्त्र दलाची स्थापना करण्यात आली असून या गटाचे जवळपास तीन हजार सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यात झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये उजव्या गटाचा राष्ट्रवादी पक्ष म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘नॅशनल डेमोक्रसी’ला 30 हजारांहून अधिक मते मिळाली होती. ‘नॅशनल होम गार्ड’च्या स्थापनेमागे याच पक्षाचा हात असल्याचे मानले जाते. ‘नॅशनल होम गार्ड’च्या सदस्यांचे प्रशिक्षण तसेच संचलन राजधानी प्राग व इतर शहरात झाल्याचे तसेच देशाच्या अनेक शहरात शाखा स्थापन झाल्याची माहिती अंतर्गत गुप्तचर यंत्रणेने दिली आहे.

‘झेक रिपब्लिक’पाठोपाठ स्लोव्हेनियातही ‘स्टॅजर्स्का गार्ड’ नावाची सशस्त्र संघटना उभारण्यात आली आहे. ही संघटना स्लोव्हेनियाच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील माजी उमेदवार ‘अँड्रेज सिस्को’ यांनी स्थापन केली आहे. सिस्को यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दोन टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. ‘स्टॅजर्स्का गार्ड’मध्ये दोन हजारांहून अधिक सदस्यांचा समावेश असून त्यांच्या सशस्त्र प्रशिक्षणाचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. या गटाकडून देशातील परधर्मिय निर्वासितांना लक्ष्य करण्यात आल्याचे दावेही करण्यात आले आहेत.

झेक रिपब्लिक व स्लोव्हेनियाबरोबरच स्लोव्हाकियामध्ये केंद्र स्थापन करणारा ‘नाईट वोल्व्हज्’ हा गटही निर्वासितांविरोधातील भूमिकेचे समर्थन करणारा मानला जातो.

English   हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info