Breaking News

महासंघाने दुर्लक्ष केल्यास ‘बाल्कन’ क्षेत्रात नवे युद्ध भडकेल – युरोपिय महासंघाचे प्रमुख जीन क्लॉड जंकर यांचा इशारा

ब्रुसेल्स – ‘बाल्कन क्षेत्रातील देश हा युरोपमधील अतिशय गुंतागुंतीचा भाग असून या भागाकडे युरोपिय महासंघाने दुर्लक्ष केले तर १९९०च्या दशकाप्रमाणे नवे युद्ध भडकण्याची शक्यता आहे’, असा खरमरीत इशारा युरोपिय कमिशनचे प्रमुख जीन-क्लॉड जंकर यांनी दिला. १९९०च्या दशकात बाल्कन मधील सर्वात मोठा देश असणार्‍या ‘युगोस्लाव्हिया’मध्ये भडकलेल्या युद्धांमध्ये लाखो जणांचा बळी गेला होता. त्यानंतर ‘युगोस्लाव्हिया’चे विघटन होऊन पाच देशांची निर्मिती झाली होती.

‘बाल्कन’, युद्ध, जीन क्लॉड जंकर, युरोपिय महासंघ, राजकीय संकट, ब्रुसेल्स, नाटोजंकर यांनी गेल्या काही वर्षात बाल्कन क्षेत्रात घडणार्‍या घटना व युरोपिय महासंघाकडून बाल्कन देशांसाठी राबविण्यात येणारे धोरण याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. युरोपिय महासंघाने बाल्कन देशांना सदस्यत्त्वाचे आश्‍वासन दिले असले तरी ‘स्लोवेनिया’ व ‘क्रोएशिया’ याव्यतिरिक्त इतर बाल्कन देशांना अद्याप सदस्यत्त्व देण्यात आलेले नाही. जंकर यांच्यासह महासंघाच्या विविध नेत्यांनी बाल्कन देशांना सदस्यत्त्व मिळविण्यासाठी २०२५ साल उजाडेल, असे संकेत दिले आहेत.

‘बाल्कन देशांमध्ये त्यातही प्रामुख्याने पश्‍चिमी बाल्कन क्षेत्रातील देशांमध्ये युरोपिय महासंघ आपल्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याच्या गुंतागुंतीच्या वातावरणात अशा प्रकारची शक्यता बळावली तर नजिकच्या काळात अगदी लवकरच बाल्कन देशांमध्ये १९९०च्या दशकाप्रमाणे युद्ध भडकलेले दिसेल’, असे जंकर यांनी बजावले.

१९९०च्या दशकात आर्थिक व राजकीय संकट, वांशिक मतभेद आणि राष्ट्रवादाचा उदय यासारख्या घटकांमुळे युगोस्लाव्हियाचा भाग असणार्‍या संघराज्यांमध्ये युद्ध भडकली होती. जवळपास एक दशकांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात दोनदा नाटोला लष्करी हस्तक्षेप करणे भाग पडले होते. त्यातून सुरुवातीला पाच स्वतंत्र देशांची निर्मिती झाली होती. त्यात सर्बिया ऍण्ड मॉन्टेनेग्रो, बोस्निया ऍण्ड हर्झेगोविना, क्रोएशिया, स्लोवेनिआ, मॅसिडोनिआ यांचा समावेश होता.

‘बाल्कन’, युद्ध, जीन क्लॉड जंकर, युरोपिय महासंघ, राजकीय संकट, ब्रुसेल्स, नाटोत्यानंतर सर्बियात घेण्यात आलेल्या सार्वमतातून स्वतंत्र ‘मॉन्टेनेग्रो’ची निर्मिती झाली होती. तर २००८ साली सर्बियातील ‘कोसोवो’ प्रांताने एकतर्फी स्वातंत्र्याची घोषणा केली. अमेरिकेसह १००हून अधिक देशांनी ‘कोसोवो’ला मान्यता दिली असली तरी सदस्य देश म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने कोसोवोला स्वीकारलेले नाही. त्याचवेळी सर्बिया, रशिया व स्पेनसह इतर देशांनी कोसोवोला राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे.

युरोपिय महासंघाने दोन बाल्कन देशांना दिलेल्या सदस्यत्वानंतर सर्बिया व मॉन्टेनेग्रोशी चर्चा सुरू करून इतर देशांना वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. सदस्यत्व देण्यापूर्वी इतर देशांनी परस्परांमधील वांशिक व प्रादेशिक मतभेद मिटवावेत, असा सल्ला महासंघाच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. मात्र सर्बियासारख्या देशांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

बाल्कन देशांना सदस्यत्त्व न दिल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी त्यांना ‘इकॉनॉमिक एरिआ’चा दर्जा देऊन सदस्य देशांप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला युरोपिय कमिशनचे प्रमुख जंकर यांनी दिला आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info