Breaking News

ब्रिटन व जर्मनीत बलोचिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा

लंडन – १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र ‘बलोचिस्तान’चा मुद्दा चर्चेत आला. युरोपमधील ब्रिटन तसेच जर्मनीमध्ये बलोचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍या गटांनी निदर्शने तसेच बैठकांचे आयोजन करून बलोचिस्तानच्या मुद्याकडे लक्ष वेधले. सोशल मीडियावरही ‘फ्री बलोचिस्तान’ व ‘बलोचिस्तान सॉलिडॅरिटी डे’ यासारखे हॅशटॅग आघाडीवर होते.

पाकिस्तानकडून गेली अनेक दशके बलोचिस्तानच्या जनतेवर अत्याचार सुरू असून त्याविरोधात स्थानिक जनतेचा संघर्ष सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या संघर्षाची आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा सुरू झाली असून संयुक्त राष्ट्रसंघटनेसह अनेक प्रमुख संघटनांनी याची दखल घेतली आहे. बलोचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍या गटांनीही जगातील प्रमुख देशांमध्ये आपल्यावर पाकिस्तानी राजवटीकडून होणार्‍या अत्याचारांची माहिती हिरिरीने मांडण्यास
सुरुवात केली आहे.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून १४ ऑगस्टला बलोचिस्तानचा मुद्दा जागतिक स्तरावर उपस्थित करण्यासाठी आक्रमक मोहीम राबविण्यात आली. त्यात १४ ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येत असला तरी बलोचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही यावर भर देण्यात आला. लंडन तसेच जर्मनीतील निदर्शकांनी ‘बलोचिस्तान इज नॉट पाकिस्तान’चे फलक झळकावले.

लंडनमध्ये ‘फ्री बलोचिस्तान मुव्हमेंट’कडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात बलोचिस्तानसाठी सक्रिय असणार्‍या विविध गट व संबंधितांना एकत्र बोलावण्यात आले होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info