वुहान कोरोनाव्हायरसचा चीनच्या ‘बायोलॉजिकल प्रोग्राम’मधून उगम – अमेरिकेचे सिनेटर टॉम कॉटन यांचा आरोप

वुहान कोरोनाव्हायरसचा चीनच्या ‘बायोलॉजिकल प्रोग्राम’मधून उगम – अमेरिकेचे सिनेटर टॉम कॉटन यांचा आरोप

वॉशिंग्टन – ‘चीनच्या वुहान शहरातील प्रगत जैविक प्रयोगशाळा ‘वुहान कोरोनाव्हायरस’चा उगम झालेल्या ‘सीफूड मार्केट’पासून काही मैलांच्या अंतरावर आहे. मग या सगळ्या गोष्टी नक्की कुठे सुरू झाल्यात हा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला आहे. याचे उत्तर पुराव्यासहित देण्याची जबाबदारी चीनच्या यंत्रणा व सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीवर आहे’, अशा थेट शब्दात अमेरिकेचे सिनेटर टॉम कॉटन यांनी ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीसाठी चीनचे सत्ताधारी व त्यांच्याकडून राबविण्यात येणारा ‘बायोलॉजिकल प्रोग्राम’ जबाबदार असल्याचा आरोप केला.

    

‘वुहान कोरोनाव्हायरस’ची सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात सातत्याने चीनची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. तब्बल दीड महिना उलटून गेल्यानंतरही चीनला ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या विषाणूची संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला सादर करता आलेली नाही. त्याचवेळी प्रचंड आर्थिक निधी व मनुष्यबळ उपलब्ध असूनही चीनला साथीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे आता चीनवर उघड टीका होत असून कॉटन यांचे आरोप त्याचाच भाग आहे.

टॉम कॉटन यांनी गेल्या महिन्यात चीनच्या भूमिकेवर संशय घेणारे वक्तव्य केले होते. त्यावर अमेरिकेतील चीनच्या राजदूतांची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी अमेरिकी संसद सदस्यांची वक्तव्य संशय तसेच अफवा पसरविणारी असून त्यातून द्वेषभावना वाढीस लागेल, असा दावा केला होता. त्याचवेळी चीन सर्व प्रकारचे सहाय्य करीत असल्याचाही दावा केला होता. मात्र कॉटन यांनी त्याला प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले आहे.

वुहान कोरोनाव्हायरस हा चीनच्या जैविक युद्धाचा भाग – इस्रायलच्या माजी गुप्तचर अधिकार्‍यांचा दावा

जेरुसलेम/वॉशिंग्टन – चीनच्या इन्स्टिट्यूटमधील काही प्रयोगशाळा जैविक शस्त्रांच्या निर्मितीत सहभागी असू शकतात. जैविक शस्त्रांची निर्मिती नागरी व लष्करी अशा दुहेरी हेतूंनी वापरण्यात येणार्‍या संशोधनप्रकल्पाचा भाग असू शकतो, असे सांगून चीनमधील ‘वुहान कोरोनाव्हायरस’ हा चीनकडून सुरू असलेल्या जैविक युद्धाच्या तयारीचा भाग असू शकतो?असा खळबळजनक दावा इस्रायलचे माजी गुप्तचर अधिकारी ‘डॅनी शोहाम’ यांनी केला. 

      

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इस्रायली अधिकार्‍यांनी हा दावा केला आहे. ‘मेडिकल मायक्रोबायोलॉजी’मध्ये डॉक्टरेट मिळविणार्‍या शोहाम यांनी १९७० ते १९९१ या कालावधीत इस्रायलच्या ‘मिलिटरी इंटेलिजन्स’मध्ये अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने १९९३ साली ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स’ हा उपक्रम जैविक युद्धासंदर्भातील संशोधनासाठी असल्याचे स्पष्ट केले होते.

अमेरिकेतील आघाडीचे गुंतवणूकदार ‘कायले बास’ यांनीही ‘वुहान कोरोनाव्हायरस’चा संबंध जैविक युद्धाशी असल्याचे सांगणारे वक्तव्य केले आहे. बास यांनी कॅनडातील प्रगत जैविक प्रयोगशाळेचा उल्लेख करून यातील चिनी वंशाच्या संशोधकांनी सातत्याने चीनला भेट दिल्याकडे लक्ष वेधले. कॅनडातील प्रयोगशाळा तसेच चीनमधील प्रगत प्रयोगशाळा या ‘एबोला’, ‘सार्स’ तसेच ‘कोरोनाव्हायरस’ प्रकारातील विषाणूंचा अभ्यास करणार्‍या होत्या, याची जाणीवही बास यांनी करून दिली.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info