Breaking News

अफगाणिस्तानमध्ये दोन बाँम्ब स्फोटात १३ जणांचा बळी

Afghanistan, Third World War

कंदहार – दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या कंदहार प्रांतात केलेल्या स्फोटात नऊ जणांचा बळी घेतला असून पाच जण जखमी झाले. तर पख्तिया प्रांतात दहशतवाद्यांनी पोलिसांची स्फोटकांनी व्हॅन उडवून दिली. या स्फोटात पख्तिया प्रांतातील पोलीस प्रमुखांसह चार पोलीस अधिकाऱ्यांचा बळी गेला. ईदच्या पार्श्वभूमीवर तालिबानने संघर्षबंदीची घोषणा केली होती. याचे अफगाणिस्तान सरकारने स्वागत केले होते. पण या संघर्षबंदीनंतरही येथे दहशतवादी हल्ल्यांचे सत्र थांबलेले नाही. या स्फोटांची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली तरी हा हल्ला तालिबानने केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Afghanistan, Third World War

बुधवारी कंदहार प्रांताच्या अर्गस्तान मध्ये एका बसला दहशतवाद्यांनी लक्ष केले. या स्फोटात नऊ प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर पाख्तिया प्रांतातील करम भागात दहशतवाद्यांनी पोलिसांची व्हॅन स्फोटकांनी उडवून दिली. या हल्ल्यात या प्रांताचे पोलीस प्रमुख आणि तीन पोलीस जवान ठार झाले. पोलीस प्रमुखांच्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठीच दहशतवाद्यांनी हा बाँम्ब रस्त्याच्याकडेला लपवला होता. इथल्या जवळच्या एका चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाल्यावर हे अधिकारी चौकीवर जाण्यासाठी निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी ईदच्या पार्श्वभूमीवर तालिबानने अफगाणिस्तान सरकारशी संघर्षबंदी घोषित केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात एकामागोमाग दहशतवाद्यांचे हल्ले सुरू झाल्याचे दिसत आहेत. बुधवारी प्रवासी बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. तर मंगळवारी काबुलमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीवर घडवून आणलेल्या स्फोटाची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info