ऑस्ट्रेलियातील सायबरहल्ल्यांमागे चीनचा हात असल्याचा माध्यमांचा दावा

ऑस्ट्रेलियातील सायबरहल्ल्यांमागे चीनचा हात असल्याचा माध्यमांचा दावा

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाच्या सरकारी  राजकीय यंत्रणा, आरोग्य, शिक्षण व अत्यावश्यक सेवांवर सायबरहल्ले झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी याची माहिती देऊन या सायबरहल्ल्यांमागे एका देशाचा हात असल्याचे संकेत दिले. ऑस्ट्रेलियन माध्यमे व अभ्यासगटांनी सायबरहल्ल्यांमागे चीनचाच हात असल्याचे आरोप केले आहेत. पण चीनने हे आरोप फेटाळून लावले आहे. आधीच कोरोनावरून ऑस्ट्रेलिया व चीनचे संबंध ताणलेले आहेत. आता सायबरहल्ल्यांवरुन हा वाद अधिकच चिघळणार असल्याचे दिसते.

ऑस्ट्रेलिया, सायबरहल्ले, चीन गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातल्या सरकारी, राजकीय, व्यावसायिक, आरोग्य व शिक्षणक्षेत्रातील यंत्रणांवर सायबरहल्ले वाढले आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी हे जाहीर करुन या क्षेत्रातील सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आदेश दिले. ऑस्ट्रेलियन सुरक्षायंत्रणांनी या हल्ल्यांचा तपास सुरु केला आहे. हे सायबरहल्ले चीननेच केले असल्याची चर्चा ऑस्ट्रेलियाच्या राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमे व अभ्यासगटांमध्ये सुरु झाली आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संसदेवर सायबरहल्ला झाला होता. त्यावेळी देखील ऑस्ट्रेलियाने चीनवर बोट ठेवले होते. कालांतराने हा हल्ला चिनी हॅकर्सनीच केले असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आताही चीननेच ऑस्ट्रेलियावर सायबरहल्ले केल्याचा दावा ऑस्ट्रेलियन यंत्रणा करीत आहेत.

ऑस्ट्रेलिया, सायबरहल्ले, चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप निराधार  व मूर्खपणाचे असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. ऑस्ट्रेलियाच्या ‘स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’मधून यंत्रणा हँक झाली आहे. या इन्स्टिट्यूटला अमेरिकन कंपनी निधी पुरविते, असा उलटा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. सध्या जगभरात जाणूनबुजून चीनविरोधी प्रतिमा तयार केली जात आहे, असेही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले.

ऑस्ट्रेलियाने कोरोना साथीची स्वतंत्र व सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला होता. ऑस्ट्रेलियाने चीनच्या या धमकीची पर्वा केली नव्हती. साऊथ चायना सी मध्ये ऑस्ट्रेलियाने अमेरिकेबरोबर युद्धसराव करुन चीनला इशारा दिला होता. त्यानंतर चीनने नागरिकांना ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळण्याची सूचना केली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info