पाश्चिमात्य देशांनी मानवजातीला आण्विक विनाशाच्या उंबरठ्यावर आणले आहे

- अमेरिकेतील रशियन राजदूतांचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील पाश्चिमात्य देशांनी संपूर्ण मानवजातीला आण्विक विनाशाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे, असा गंभीर इशारा अमेरिकेतील रशियन राजदूतांनी दिला. काही दिवसांपूर्वी ब्रिटनने रणगाड्यांबरोबरच ‘डिप्लेटेड युरेनियम’चा वापर असणारे तोफगोळेही पुरविण्यात येतील, असे आण्विक विनाशाच्याजाहीर केले होते. रशियाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतरही ब्रिटन व अमेरिकेने या पुरवठ्याचे समर्थन केले होते. त्यावरून रशियन राजदूतांनी पाश्चिमात्य देशांवर टीकास्त्र सोडले.

‘अशा प्रकारच्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हीच निरर्थक बाब आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्ये करून नवी नीचांकी पातळी गाठली आहे. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला सातत्याने घातक शस्त्रांचा पुरवठा सुरू आहे. या शस्त्रांचा वापर सामान्य जनतेविरोधात होत आहे. याची जाणीव असतानाही अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील पाश्चिमात्य देश आण्विक सामुग्रीच्या पुरवठ्याचे समर्थन करून मानवजातीला आण्विक विनाशाच्या उंबरठ्यावर आणून उभे करीत आहेत’, अशी टीका ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनी केली.

युक्रेनला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने युक्रेनला प्रगत ‘चॅलेंजर’ रणगाडे पुरविण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात अधिक माहिती देताना ब्रिटनच्या संरक्षण राज्यमंत्री ॲनाबेल गोल्डी यांनी, रणगाड्यांबरोबरच ‘डिप्लेटेड युरेनियम’चा वापर असणारे तोफगोळेही पुरविण्यात येतील, असे जाहीर केले. ब्रिटनच्या या घोषणेमुळे युरोपसह आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रशियाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. रशियन संसदेचे सभापती वोलोदिन यांनी ब्रिटनची योजना युक्रेनच नाही तर संपूर्ण युरोपसाठी धोकादायक ठरेल, असे बजावले. शेवटच्या युक्रेनियन नागरिकापर्यंत लढण्यात येणाऱ्या युद्धाचे रुपांतर शेवटच्या युरोपियन नागरिकापर्यंतच्या युद्धात होईल, असा गंभीर इशारा रशियन संसदेच्या सभापतींनी दिला. तर रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी ब्र्रिटनची घोषणा म्हणजे नवी चिथावणी असल्याचा आरोप केला.

रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनीही वाढत्या आण्विक धोक्याकडे लक्ष वेधले. गेल्या काही दशकांचा विचार करता सध्या आण्विक संघर्षाचा धोका सर्वाधिक पातळीवर आहे, असे रिब्कोव्ह म्हणाले. त्याचवेळी रशिया अमेरिकेबरोबरील ‘न्यू स्टार्ट टीि’वर सध्या तरी फेरविचार करण्याच्या स्थितीत नसल्याचेही त्यांनी बजावले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info