Breaking News

अमेरिकेच्या अर्थ व व्यापार विभागावर रशियाचा सायबरहल्ला – अमेरिकेच्या सीआयएसएचा आरोप

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकेच्या अर्थ व व्यापार विभागाच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर मोठा सायबरहल्ला झाल्याची माहिती उघड झाली आहे. अंतर्गत सुरक्षा विभाग (होमलँड सिक्युरिटी) व ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) याचा तपास सुरू केला असून हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा संशय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील आघाडीची सायबरसुरक्षा कंपनी असणार्‍या ‘फायर आय’वर मोठा सायबरहल्ला झाल्याचे समोर आले होते. सरकारी विभागांवर झालेला हल्ला त्याच मोहिमेचा भाग असावा, असे मानले जाते. रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अर्थ व व्यापार, सायबरहल्ला, होमलँड सिक्युरिटी, एफबीआय, सत्तांतराची प्रक्रिया, अमेरिका, रशिया, फायर आय, TWW, Third World War

अमेरिकेच्या ‘सायबरसिक्युरिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी’ने (सीआयएसए) रविवारी सायबरहल्ल्यांची माहिती जाहीर केली. त्यात अर्थ व व्यापार विभागाच्या नेटवर्क्सवर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले आहे. ‘सीआयएसए’बरोबरच ‘होमलँड सिक्युरिटी’, ‘एफबीआय’ व ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ हल्ल्याचा तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून हा सायबरहल्ला सुरू असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकी माध्यमे व तज्ज्ञांनी हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचे सांगून गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा सायबरहल्ला ठरल्याचा दावा केला आहे.

अर्थ व व्यापार, सायबरहल्ला, होमलँड सिक्युरिटी, एफबीआय, सत्तांतराची प्रक्रिया, अमेरिका, रशिया, फायर आय, TWW, Third World War

सायबरहल्ल्यासाठी ‘सोलरविंड्स’ या ‘सर्व्हर सॉफ्टवेअर’चा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवड्यात ‘फायर आय’वर झालेल्या हल्ल्यातही याचाच वापर झाल्याचे समोर आले होते. अमेरिकेतील प्रमुख सरकारी विभाग व ‘फॉर्च्युन ५००’ यादीतील अनेक आघाडीच्या कंपन्यांकडून या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यामुळे सायबरहल्ल्याची व्याप्ती अधिक वाढू शकते, असे संकेतही अमेरिकी यंत्रणांकडून देण्यात आले आहेत. या सायबहल्ल्यांच्या मुद्यावर अमेरिकेत ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ची बैठक झाल्याची माहितीही देण्यात आली.

अर्थ व व्यापार, सायबरहल्ला, होमलँड सिक्युरिटी, एफबीआय, सत्तांतराची प्रक्रिया, अमेरिका, रशिया, फायर आय, TWW, Third World War

सायबरहल्ल्यातील सहभागावरून झालेले आरोप रशियाने स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत. ‘रशिया आपल्यावरील आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावत आहे. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीच अमेरिकेबरोबर सायबरसुरक्षा कराराबाबत पुढाकार घेतला होता. त्याला अमेरिकेने प्रतिसाद दिला नव्हता. सध्याचे सायबरहल्ले अनेक महिन्यांपासून चालू असल्याचे सांगण्यात येते व अमेरिकेला त्याबाबत काही करता आलेले नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांचा दोष रशियावर ढकलणेही कदाचित योग्य ठरणार नाही. तसाही रशियाचा या हल्ल्यांशी काहीही संबंध नाही’, असे रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सांगितले.

अमेरिकेत गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपद व संसदेच्या निवडणुका, त्याचे निकाल व सत्तांतराची प्रक्रिया या पार्श्‍वभूमीवर एकापाठोपाठ एक मोठे सायबरहल्ले उघड होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. २०१६ साली झालेल्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवरही अमेरिकेवर सायबरहल्ले झाले होते. त्यावेळी झालेल्या सायबरहल्ल्यांमागेही रशियाचा हात असल्याचे आरोप झाले होते. हे हल्ले डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी घडविल्याचा आरोप ‘डेमोक्रॅट्स’ पक्षाने तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करण्यात आला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info