जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी

जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी

वॉशिंग्टन – ‘‘‘जागतिक व्यापार संघटने’ने (डब्ल्यूटीओ) अमेरिकाविरोधी भूमिका सोडली नाही तर अमेरिका या संघटनेतून बाहेर पडेल’’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. रशियाने अमेरिकेच्या उत्पादनांवर अतिरिक्त कर लादले होते. रशियाच्या या निर्णयाविरोधात ‘डब्ल्यूटीओ’ कारवाई करीत नसल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला. रशियाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आरोप फेटाळले असून आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले नाही तर अमेरिकेला नुकसान सोसावे लागेल, असे रशियाने बजावले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, धमकी, जागतिक व्यापार संघटना, WTO, रशिया, निर्बंध, WW3, सोन्यामधील गुंतवणूकदोन तसेच त्याहून अधिक देशांमधील व्यापाराचे नियमन व व्यापारी तंटे सोडविण्यासाठी ‘जागतिक व्यापार संघटने’ची (डब्ल्यूटीओ) स्थापना झाली होती. पण ही आंतरराष्ट्रीय संघटना बर्‍याचदा अमेरिकाविरोधी निकाल देत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. काही ‘डब्ल्यूटीओ’चे निकाल अमेरिकेच्या बाजूने लागले होते, हेही ट्रम्प यांनी मान्य केले. पण या संघटनेच्या मोठ्या निर्णयांमुळे अमेरिकेचे नुकसान होत असल्याचा दावा ट्रम्प यांनी अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

गेल्या काही वर्षांपासून रशियाने अमेरिकेच्या उत्पादनांवर निर्बंध तसेच अतिरिक्त कर लादले आहेत. अमेरिकेच्या मागणीनंतरही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सदर निर्बंध तसेच कर मागे घेण्यास नकार दिला असून येत्या वर्षअखेरीपर्यंत अमेरिकेच्या उत्पादनांवरील हे निर्बंध कायम राहणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले आहे. रशियाच्या या अरेरावीविरोधात ‘डब्ल्यूटीओ’ ठोस निर्णय घेत नसल्याची टीका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.

अमेरिकेच्या उत्पादनांवरील रशियाचे निर्बंध व कर आंतरराष्ट्रीय व्यापारी नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. यानंतरही ‘डब्ल्यूटीओ’ आपल्या भूमिकेत बदल करणार नसेल तर अमेरिका या संघटनेतून बाहेर पडेल, अशी धमकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी दिली. ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूटीओ’च्या अमेरिकाविरोधी भूमिकेवर याआधीही टीका केली होती. ही जागतिक व्यापारी संघटना अमेरिका वगळता इतर देशांच्या हितासाठी काम करीत असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला होता. तर ‘डब्ल्यूटीओ’ अमेरिकेच्या सार्वभौमत्वात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने केला होता.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ‘डब्ल्यूटीओ’ला दिलेल्या या इशार्‍यावर रशियाकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘डब्ल्यूटीओ’तून बाहेर पडण्याची धमकी देणार्‍या अमेरिकेकडूनच आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन होत नसल्याची टीका रशियाच्या अर्थमंत्र्यांनी केली. तसेच अमेरिकेने जागतिक व्यापारी संघटनेतून बाहेर पडण्याची तसेच आंतरराष्ट्रीय नियमांविरोधात जाण्याची चूक केली तर त्याचे गंभीर परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागतील, असा इशारा रशियाच्या अर्थमंत्र्यांनी दिला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेने रशियावर टाकलेल्या निर्बंधांचा परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिकेच्या या निर्बंधांचा सामना करण्यासाठी रशियाने डॉलरमधील व्यवहार थांबविले असून सोन्यामधील गुंतवणूक वाढविली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info