भारत व अमेरिकेमध्ये पार पडलेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेचे परिणाम दिसू लागले

भारत व अमेरिकेमध्ये पार पडलेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेचे परिणाम दिसू लागले

नवी दिल्ली/इस्लामाबाद – भारत आणि अमेरिकेमध्ये पार पडलेल्या पहिल्या ‘टू प्लस टू’ चर्चेचे परिणाम दिसू लागले आहेत. सदर चर्चा पार पडल्यानंतर अवघ्या काही तासातच चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानात धाव घेतली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी चीन सर्वतोपरी सहाय्य करील, अशी घोषणा चीनचे परराष्ट्रमंत्री ‘वँग ई’ यांनी यावेळी केली. तर नेपाळसाठी चीनची बंदरे खुली करून या देशाचे भारतावरील अवलंबित्त्व कमी करण्यासाठी चीनने प्रयत्न सुरू केले आहेत. हे सारे ‘टू प्लस टू’ चर्चा पार पडल्यानंतर घडले हा योगायोग नसून त्यामागे चीनची आक्रमक रणनीति असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘टू प्लस टू’, चर्चा, सामरिक करार, कॉमकासा, चीन, पाकिस्तान, ww3, सहकार्य, भारत, रशियारशिया व इराणवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनुसार भारताने या देशांबरोबरील सहकार्य रोखावे, अशी अमेरिकेची आग्रही मागणी होती. भारताने याला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे ‘टू प्लस टू’ चर्चा पुढे ढकलून अमेरिकेने भारतावरील दडपण वाढविल्याचे बोलले जात होते. पण 6 सप्टेंबर रोजी ही चर्चा सुरू झाली. त्याच्या आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सदर चर्चेत भारताच्या रशियाबरोबरील संबंधांचा विषय अग्रक्रमावर नसेल, असे जाहीर केले होते. याद्वारे अमेरिकेकडून सदर चर्चेत कुठल्याही प्रकारचा अडसर नसेल, असे संकेत देण्यात आले होते.

स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला नसला तरी ‘टू प्लस टू’ चर्चेत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यात आला. तसेच यासाठी भारत व अमेरिकेने सहकार्य वाढविण्याची तयारी दाखवून चीनला योग्य तो संदेश दिला. इतकेच नाही तर दहशतवादाच्या मुद्यावर देखील दोन्ही देशांनी एकजूट दाखवून पाकिस्तानवरील दडपण वाढविले होते. विशेषतः मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हफीज सईद याच्या शीरावर अमेरिकेने इनाम घोषित केल्यानंतरही पाकिस्तानात मोकाट वावरत आहे, यावर भारताबरोबर अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली होती.

‘‘भारत व रशियामध्ये १९७१ सालच्या ऑगस्ट महिन्यात सामरिक करार संपन्न झाला होता. या करारानुसार रशियावर कुणी आक्रमण केले तर भारत रशियाच्या बाजूने युद्धात उतरणार होता. तर भारताबरोबर कुठल्याही देशाने युद्ध पुकारले तर रशिया या युद्धात भारताच्या बाजूने उडी घेणार होता. हा करार म्हणजे त्या काळात भारताने पाकिस्तानच्या विरोधात केलेली युद्धाची घोषणाच होती. यातूनच १९७१ सालचे युद्ध सुरू झाले आणि भारताने पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान वेगळे काढून बांगलादेशची निर्मिती केली. आत्ताही अमेरिकेबरोबर भारताने ‘कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी, सिक्युरिटी अ‍ॅग्रीमेंट -कॉमकासा’ करार करून पाकिस्तानच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आहे’’, असा दावा पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकार्‍याने केला आहे.

‘‘‘टू प्लस टू’ चर्चेत केवळ एकाच देशाचा थेटपणे उल्लेख करण्यात आला असून हा देश म्हणजे पाकिस्तान आहे’’, याकडे पाकिस्तानच्या या माजी राजनैतिक अधिकार्‍याने लक्ष वेधले. त्यामुळे लवकरच भारत व अमेरिका मिळून पाकिस्तानला अद्दल घडवतील, अशी चिंता या पकिस्तानच्या माजी अधिकार्‍याने व्यक्त केली.

तर भारत व अमेरिकेमध्ये प्रस्थापित होत असलेले सामरिक सहकार्य आपल्याला आव्हान देण्यासाठीच असल्याचे चीनचे म्हणणे आहे. विशेषतः ‘टू प्लस टू’ चर्चेनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व संरक्षणमंत्र्यांनी हॉटलाईन सुरू करण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरतो. यामुळे एखाद्या संवेदनशील मुद्यावर त्वरित निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे उभय देशांना सहज शक्य होईल. यामुळे ‘इंडो पॅसिफिक’ क्षेत्रात वर्चस्व गाजविण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला फार मोठा धक्का बसला आहे.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info