रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनचा ताबा घेण्याच्या तयारीत – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांचा आरोप

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनचा ताबा घेण्याच्या तयारीत – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांचा आरोप

किव्ह/मॉस्को – ‘पुतिन यांच्या खोटारडेपणावर विश्‍वास ठेवू नका. रशियन राष्ट्राध्यक्षांना जुने रशियन साम्राज्य पुन्हा स्थापन करायचे आहे. क्रिमिआ, डोन्बाससह पूर्ण युक्रेन पुतिन यांना ताब्यात घ्यायचा आहे. ते स्वतःला रशियन सम्राट झार समजतात, त्यामुळे त्यांचे साम्राज्य युक्रेनशिवाय पूर्ण होणार नाही. पुतिन यांना युक्रेन रशियाची वसाहतच वाटते’, अशा आक्रमक शब्दात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाकडून पूर्ण युक्रेन ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालल्याचा आरोप केला. मात्र रशियन राष्ट्राध्यक्षांनी रशियन नौदलाच्या कृतीचे समर्थन केले असून युक्रेनकडून जाणीवपूर्वक चिथावणीखोर कारवाई करण्यात आल्याचा दावा केला.

रशियन साम्राज्य, स्थापन, पेट्रो पोरोशेन्को, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, चिथावणीखोर कारवाई, ww3, रशिया, अँजेला मर्केलरविवारी युक्रेन नौदलाच्या दोन गनबोट्स व एक टगबोट क्रिमिआनजिक असणार्‍या कर्श सामुद्रधुनीतून ‘अ‍ॅझोव्ह सी’मध्ये दाखल झाल्या होत्या. या बोटी सूचना न देता रशियन सागरी हद्दीत आल्या होत्या, असा आरोप करून रशियाने त्यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत बोटींवरील तीन खलाशी जखमी झाले असून रशियन सुरक्षादलांनी बोटींसह त्यावरील खलाशी व अधिकारी ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर युक्रेनने तीव्र प्रतिक्रिया देऊन ‘मार्शल लॉ’ लागू केल्याची घोषणा केली.

युक्रेनबाबत निर्माण झालेल्या या तणावानंतर सुरक्षा परिषदेची तातडीने बैठकही घेण्यात आली. या बैठकीत, अमेरिका व युरोपिय देशांनी रशियाच्या कारवाईवर तीव्र टीकास्त्र सोडले. त्याचवेळी नाटोने रशियाला युक्रेनच्या बोटी व कर्मचारी सोडून देण्याचे आवाहन केले. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी याप्रकरणी आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे संकेतही दिले. मात्र त्यानंतरही युक्रेनचा तिढा सुटण्याची अद्यापही कोणतीही चिन्हे समोर आलेली नाहीत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पोरोशेन्को यांनी या मुद्यावर अधिकच आक्रमक भूमिका घेतली असून ‘सी ऑफ अ‍ॅझोव्ह’मधील घटना म्हणजे रशियाचे आक्रमण असल्याचा आरोप केला आहे. रशियाने क्रिमिआ व पूर्व युक्रेन ताब्यात घेतला असून आता अ‍ॅझोव्ह सी ताब्यात घ्यायचा आहे, असा दावा त्यांनी केला. अ‍ॅझोव्ह सीवरील रशियाचे आक्रमण रोखण्यासाठी जर्मनीसह नाटो सदस्य देशांनी तातडीने त्यांच्या युद्धनौका या क्षेत्रात तैनात कराव्यात, अशी मागणी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.

त्यांच्या या मागणीला नाटो व इतर देशांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. मात्र नाटोच्या सूत्रांनी युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर या भागातील नौदल तैनाती यापूर्वीच वाढविली असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, अ‍ॅझोव्ह सीमधील वाद सुरू असतानाच रशियाने क्रिमिआ प्रांतात ‘एस-400’ ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info