पारंपरिक युद्धात भारताला हरवू शकणार नाही याची शत्रूला जाणीव – वायुसेनाप्रमुखांचा पाकिस्तानला टोला

पारंपरिक युद्धात भारताला हरवू शकणार नाही याची शत्रूला जाणीव – वायुसेनाप्रमुखांचा पाकिस्तानला टोला

पोखरण – ‘पारंपारिक युद्धात आपण भारताला हरवू शकणार नाही, हे शत्रूला ठाऊक आहे. कारण शत्रूला धडा शिकविण्याची, त्यांच्या सीमेत घुसून कारवाई करण्याची आमची क्षमता आम्ही दाखवून दिली आहे’, असे वायुसेना प्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी म्हटले आहे. वायुसेनेचा ‘वायु शक्ती- २०१९’ हा युद्धसराव राजस्थानच्या पोखरणमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ सुरू असून यावेळी वायुसेनाप्रमुखांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष टोला लगवाला आहे. तसेच वायुसेना कोणत्याही आव्हानासाठी सज्ज असल्याचे वायुसेनाप्रमुख धनोआ म्हणाले.

राजस्थानच्या ‘पोखरण’मध्ये वायूसेनेचा ‘वायु शक्ती २०१९’ हा सराव सुरु झाला. या युद्धसरावात जॅग्वार, सुखोई, मिराज-२०००’, मालवाहतूक करणारे ‘एएन-३२’, ‘सी-१३०’सह १३७ विमानांनी या युद्धसरावात भाग घेतला. इतकेच नाही तर ‘एमआय-१७’ व ‘एमआय-३५’ हेलिकॉप्टर्सही या सरावात सहभागी झाले होते. या सरावादरम्यान ‘मिग २९’ या लढाऊ विमानाचा प्रथमच समावेश करण्यात आला होता.

पाकिस्तान सीमेजवळ सुरू असलेला हा युद्धसराव पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. यावेळी वायुसेनेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वायुसेना प्रमुखांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ‘राजकीय नेतृत्व जशी जबबादारी देईल, त्याप्रमाणे ती पार पाडण्यास वायुसेना सदैव तैयार आहे आणि दिलेल्या जबाबदारीला त्याच्या परिणामांपर्यंत पोहोचविण्यात वायुसेना सदैव अग्रेसर असेल’, असे वायुसेनाप्रमुख धनोआ म्हणाले.

भारतीय वायुसेनेने आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहेत. दिवसा व रात्री, प्रतिकूल परिस्थितीतही वायुसेनेकडे हल्ला करण्याची क्षमता आहे. यामुळेच पारंपारिक युद्ध झाले, तर भारताला आपण हरवू शकणार नाही याची जाणीव शत्रूला असल्याचे सांगून त्यांनी पाकिस्तानला परिणामांची जाणीव करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल करवाई करण्यासाठी भारतीय सुरक्षादलांना पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर वायुसेना प्रमुखांच्या या विधानाचे महत्त्व वाढले आहे.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info