व्हेनेझुएलाच्या मदुरो राजवटीला सहकार्य करणार्‍या क्युबावर अमेरिकेचे नवे निर्बंध

व्हेनेझुएलाच्या मदुरो राजवटीला सहकार्य करणार्‍या क्युबावर अमेरिकेचे नवे निर्बंध

वॉशिंग्टन/हवाना – ‘राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका कधीही हुकुमशहांना जीवनदान देण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही. उलट असे प्रयत्न करणार्‍यांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी क्युबाविरोधात नव्या निर्बंधांची घोषणा केली. त्यानुसार, अमेरिकेत वास्तव्य करणारे क्युबन नागरिक क्युबातील सत्ताधारी राजवटीला सहाय्य करणार्‍या कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करू शकणार आहेत. अमेरिकेच्या या घोषणेवर कॅनडा व युरोपिय महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

क्युबा, मदुरो राजवटीला सहकार्य, जॉन बोल्टन, निर्बंध, कायदेशीर कारवाई, world war 3, अमेरिका, व्हेनेझुएला, रशियाव्हेनेझुएलात निकोलस मदुरो यांच्या हुकुमशाहीविरोधात जनतेत तीव्र असंतोष असून अमेरिकेसह अनेक देशांनी त्यांचे नेतृत्त्व नाकारले आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला रशिया, चीन व क्युबासारखे देश व्हेनेझुएलाला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरवित असल्याचे समोर आले आहे. या सहकार्यामुळेच मदुरो यांनी सत्ता राखण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने रशिया व चीनला यापूर्वीच व्हेनेझुएलातील हस्तक्षेप थांबविण्याचे इशारे दिले आहेत.

आता अमेरिकेकडून क्युबाला लक्ष्य करण्यात येत असून या देशाकडून व्हेनेझुएलाला करण्यात येणारे सहाय्य थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अमेरिकेच्या मियामीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोल्टन यांनी केलेली घोषणा याचाच भाग ठरतो. क्युबातील सत्ताधारी राजवटीने ज्या अमेरिकी नागरिकांची मालमत्ता जबरदस्तीने बळकावली आहे, असे नागरिक क्युबाविरोधात कायदेशीर कारवाई म्हणून याचिका दाखल करू शकतात, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी स्पष्ट केले. यात क्युबन राजवटीला सहाय्य करणार्‍या कंपन्यांचाही समावेश आहे.

क्युबातील या कंपन्यांमध्ये युरोपियन कंपन्यांचाही समावेश असल्याने अमेरिकेच्या या घोषणेविरोधात महासंघाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेने अशा प्रकारे कायदेशीर कारवाईला परवानगी दिल्यास युरोपही अमेरिकी कंपन्यांविरोधात त्याच स्वरुपाची कारवाई करेल, असा इशारा युरोपिय महासंघाने दिला. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत एक निवेदन जारी करून नाराजी व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांच्यापूर्वी सत्तेवर असणारे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबाबरोबरील संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी अमेरिकेकडून टाकण्यात आलेले काही निर्बंधही मागे घेण्यात आले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info