व्हेनेझुएलातील मदुरो यांच्या सरकारसाठी रशिया अमेरिकेशी संघर्ष करील – रशियाचा इशारा

व्हेनेझुएलातील मदुरो यांच्या सरकारसाठी रशिया अमेरिकेशी संघर्ष करील – रशियाचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्को/कॅराकस – ‘रशियाच्या वाढत्या प्रभावाचा मुद्दा पुढे करून अमेरिका व्हेनेझुएलावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. मात्र रशियाच्या व्हेनेझुएलातील सर्व हालचाली त्या देशातील कायदेशीर राजवटीच्या परवानगीनेच होत आहेत, याची अमेरिकेने जाणीव ठेवावी’, अशा शब्दात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोवा यांनी रशिया व्हेनेझुएलाच्या मुद्यावर अमेरिकेशी संघर्ष करण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला.

रशिया, अमेरिकेशी संघर्ष, मारिआ झाखारोवा, प्रवक्त्या, आक्रमण, व्हेनेझुएला, अमेरिका, चीन

गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी व्हेनेझुएलाच्या मुद्यावर बोलताना लष्कर ‘सज्ज’ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी, व्हेनेझुएलाच्या मुद्यावर सर्व पर्याय खुले असल्याचे बजावले होते. अमेरिकी लष्कर व नेतृत्त्वाकडून येणार्‍या या वक्तव्यांचा समाचार घेताना रशियन प्रवक्त्यांनी रशियाही तयारीत असल्याचे संकेत दिले.

‘अमेरिकी नेतृत्त्वाकडून करण्यात येणार्‍या वक्तव्यांनी हा देश व्हेनेझुएलावर आक्रमण करण्याच्या हालचाली करीत असल्याची आमची भीती खरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी रशियाच्या प्रभावाचे कारण पुढे करण्यात येत आहे. अमेरिकेने यापूर्वी केलेल्या कारवायांप्रमाणे व्हेनेझुएलातील जनतेवर बॉम्बहल्ले करण्यात येतील, असे दिसत आहे’, असा आरोप रशियन प्रवक्त्यांनी केला.

रशिया, अमेरिकेशी संघर्ष, मारिआ झाखारोवा, प्रवक्त्या, आक्रमण, व्हेनेझुएला, अमेरिका, चीनअमेरिकेने गेल्या काही आठवड्यांमध्ये व्हेनेझुएलाच्या सीमेनजिक असलेल्या देशांमध्ये लष्करी तुकड्या तैनात केल्या असून त्यात हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. अमेरिकेची टेहळणी विमाने व्हेनेझुएलाच्या सागरी तसेच हवाई हद्दीत टेहळणी करीत असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकी नौदलाकडून लॅटिन अमेरिकी देशांमध्ये नौदल सराव आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्तही उघड झाले आहे.

त्याचवेळी रशियाने आपल्या किमान १०० सैनिकांची तुकडी व्हेनेझुएलात तैनात केल्याचे सांगण्यात येते. रशियाबरोबरच चीनचे सैनिकही व्हेनेझुएलात असल्याचे सांगण्यात येते. रशियाने लष्करी तुकडीव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व आवश्यक संरक्षण सामुग्रीही व्हेनेझुएलाला पुरविली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info