वॉशिंग्टन – गेल्या काही तासांमध्ये अमेरिकेने आखातात विमानवाहू युद्धनौका आणि बॉम्बर्स विमाने तैनात केली असली तरी अमेरिका इराणच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. इराणच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला तर त्यांच्याशी चर्चा करून चांगल्या वाटाघाटीही करता येतील, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
गेल्या दहा दिवसात अमेरिकेने इराणवर सातत्याने नवे निर्बंध लादले आहेत. तसेच इराणच्या सागरी क्षेत्राजवळ लष्कर तैनातीही केली आहे. तरी देखील अमेरिका इराणबरोबर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. इराणची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी आणि इराण सक्षम देश म्हणून उभा रहावा, असे आपल्याला मनापासून वाटत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
पण इराणच्या नेत्यांनी अमेरिकेशी चर्चा करू नये, यासाठी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला. ‘केरी इराणी नेत्यांच्या सतत संपर्कात असून अमेरिकेचे नागरिक म्हणून केरी यांनी आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर ‘लोगन कायद्या’नुसार कारवाई केली जावी’, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |