चीनबरोबर युद्ध पुकारल्यास फिलिपाईन्स अमेरिकेला साथ देईल – फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते

चीनबरोबर युद्ध पुकारल्यास फिलिपाईन्स अमेरिकेला साथ देईल – फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते

मनिला – ‘‘‘साऊथ चायना सी’मध्ये अमेरिकेची लढाऊ विमाने तैनात करावी, अमेरिकेच्या युद्धनौका या क्षेत्रात दाखल कराव्यात. चीनविरोधात युद्ध पुकारावे. या सागरी संघर्षात अमेरिकेने पहिली गोळी झाडली तर फिलिपाईन्स चीनविरोधात अमेरिकेला साथ देईल’’, अशी ग्वाही फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी दिली. या सागरी क्षेत्रात चीन व फिलिपाईन्समधील वाद चिघळत चालला असून त्या पार्श्‍वभूमीवर आक्रमकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी केलेल्या या विधानांना फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष, ग्वाही, रॉड्रिगो दुअर्ते, साऊथ चायना सी, आवाहन, WW3, अमेरिका, चीन, पाग-असा

गेल्या काही आठवड्यांपासून ‘साऊथ चायना सी’मधील वाद पुन्हा एकदा उफाळत आहे. काही दिवसांपूर्वी चीनने फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील ‘पाग-असा’ बेटांजवळ विनाशिका रवाना केल्या होत्या. त्याचबरोबर चीनने येथील सागरी क्षेत्रात आपले ‘सिक्रेट नौदल’ही तैनात केले होते. चीनच्या या आक्रमक भूमिकेविरोधात राष्ट्राध्यक्ष दुअर्ते कठोर भूमिका स्वीकारत नाही, अशी टीका फिलिपाईन्समधून झाली होती. राष्ट्राध्यक्ष दुअर्ते चीनबरोबर राजकीय व व्यापारी सहकार्य वाचविण्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात टाकत असल्याचा ठपका फिलिपाईन्समधील काही नेत्यांनी केला होता.

दोन दिवसांपूर्वी आपल्यावरील या टीकेला उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी अमेरिकेला चीनवर हल्ला चढविण्याचे आवाहन केले. ‘‘फिलिपाईन्स कधीही चीनविरोधात युद्ध जिंकू शकत नाही. फिलिपाईन्सने आपल्या सागरी क्षेत्राच्या अधिकारांसाठी चीनविरोधात युद्ध पुकारले तर फिलिपाईन्सला फार मोठे नुकसान सोसावे लागेल. फिलिपाईन्सच्या पलावान प्रांतावर चीनचा पहिला हल्ला होईल. त्यामुळे मी माझ्या सैनिकांना मृत्यूच्या दारात ढकलू शकत नाही’’, असे थेट उद्गार काढून राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी अमेरिकेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

‘‘पण जर अमेरिकेने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात विमाने आणि युद्धनौका रवाना करून चीनविरोधात युद्ध पुकारले तर फिलिपाईन्स अमेरिकेच्या बाजूने या युद्धात सहभागी होईल’’, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी जाहीर केले. अमेरिका आणि फिलिपाईन्समध्ये झालेल्या ऐतिहासिक कराराची आठवण राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी करून दिली.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info