आर्मेनियाकडून अझरबैजानच्या इंधनक्षेत्रानजिक मोठे हल्ले – अझरबैजानचा आरोप

आर्मेनियाकडून अझरबैजानच्या इंधनक्षेत्रानजिक मोठे हल्ले – अझरबैजानचा आरोप

येरेवान/बाकु – आर्मेनियाने दोन आंतरराष्ट्रीय इंधनवाहिन्या असलेल्या क्षेत्रात ‘क्लस्टर रॉकेट’च्या सहाय्याने मोठे हल्ले चढविल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. आर्मेनियाने इंधनवाहिन्यांबाबतचे आरोप नाकारले असले तरी अझरबैजानी लष्कराचे इंधन साठे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या वक्तव्यांवरून दोन देशांमध्ये सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या हालचालींनाही वेग आला असून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संघर्षबंदी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी जीनिव्हामध्ये एक बैठक होत असल्याचेही समोर आले असून त्यात अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी, आर्मेनिया-अझरबैजान युद्ध थांबले नाही तर त्यातून क्षेत्रीय युद्ध भडकू शकते, असा इशारा दिला.

हल्ले

सलग १२ दिवस आर्मेनिया-अझरबैजान युद्ध सुरू असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे समोर येत आहे. आर्मेनियाकडून अझरबैजानच्या इंधनक्षेत्रांवर हल्ले सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अझरबैजानमध्ये ‘बाकु-तब्लिसी-सिहन’ व ‘साऊथ कॉकेशस गॅस पाईपलाईन’ या दोन आंतरराष्ट्रीय इंधनवाहिन्या आहेत. या दोन्ही ‘नागोर्नो-कॅराबख’ प्रांताच्या सीमेनजीक असून या क्षेत्रात क्लस्टर रॉकेटचे हल्ले झाल्याचा दावा अझरबैजानने केला. काही बॉम्बस् ‘बाकु-तब्लिसी-सिहन’ इंधनवाहिनीपासून १० मीटर्सच्या अंतरावर पडल्याचे अझरबैजानने म्हंटले आहे.

हल्ले

आर्मेनियाने इंधनक्षेत्रावरील हल्ल्यांचे आरोप नाकारले आहेत. मात्र त्याचवेळी अझरबैजानमधील लष्करी इंधनसाठयांवर हल्ले केल्याची माहिती दिली आहे. कॅराबखच्या दक्षिण सीमेनजीक असणाऱ्या ‘ऑईल डेपों’वर हल्ले केल्याचे आर्मेनियन प्रवक्त्यांनी सांगितले. यापुढेही अझरबैजानमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांवर हल्ले सुरू राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे. इंधनक्षेत्र व साठयांवर झालेल्या हल्ल्यांमुळे आता आंतरराष्ट्रीय इंधन बाजारपेठेतही युद्धाचे पडसाद उमटू शकतात, असे मानले जाते.

हल्ले

दरम्यान, आर्मेनिया-अझरबैजान युद्ध तीव्र होत असतानाच संघर्षबंदीसाठी सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालींनाही वेग आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एका मुलाखतीत, संघर्षबंदी आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी सध्या सुरू असलेले युद्ध शोकांतिका असल्याचा दावा करून, रशियाला त्याबद्दल तीव्र चिंता वाटत असल्याचे म्हंटले आहे. त्याचवेळी रशियाने यापूर्वीही कराराचे पालन केले असून यापुढेही त्यासाठी वचनबद्ध आहे, अशा शब्दात आर्मेनियाच्या सुरक्षेसाठी रशिया सज्ज असल्याची ग्वाहीदेखील दिली.

पुतिन यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर जीनिव्हा शहरात आर्मेनिया-अझरबैजान मुद्यावर बैठक सुरू झाली आहे. रशियाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या बैठकीत अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र आर्मेनियाने त्यात सामील होण्याचे नाकारले आहे. तर तुर्कीनेही त्यावर टीका केली असून, ‘नागोर्नो-कॅराबख’मधील जैसे थे स्थिती बदलण्याची गरज आहे, या शब्दात युद्ध सुरू राहण्याचे संकेत दिले आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info