रशियाच्या पाणबुडीतून चार आंतरखंडीय अण्वस्त्रांची चाचणी

रशियाच्या पाणबुडीतून चार आंतरखंडीय अण्वस्त्रांची चाचणी

मॉस्को – रशियाने आपल्या प्रगत ‘बोरेय क्लास’ आण्विक पाणबुडीतून चार आंतरखंडीय अण्वस्त्रांची चाचणी घेतल्याचे जाहीर केले. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली असून चाचणीचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्त्वाखाली ‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी घेतल्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ एकाच वेळी चार आंतरखंडीय अण्वस्त्रांची चाचणी घेऊन रशियाने, अमेरिका व नाटोविरोधातील आक्रमक धोरण कायम राहिल, असे संकेत दिले आहेत.

आंतरखंडीय अण्वस्त्रांची, चाचणी, ‘न्यूक्लिअर ट्रायड’, अण्वस्त्र, अणुयुद्ध, रशिया, अँटी सॅटेलाईट वेपन, TWW, Third World War

शनिवारी रशियाच्या संरक्षण विभागाने पॅसिफिक महासागराचा भाग असलेल्या ‘सी ऑफ ओखोत्स्क’मध्ये ‘व्लादिमिर मोनोमॅख’ या आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडिय अण्वस्त्रांची चाचणी घेतल्याचा व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. एकाच पाणबुडीवरून सलग चार अण्वस्त्रांच्या चाचण्या घेतल्या जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. चाचणीसाठी प्रगत ‘आरएसएम-56 बुलावा’ अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला.

आंतरखंडीय अण्वस्त्रांची, चाचणी, ‘न्यूक्लिअर ट्रायड’, अण्वस्त्र, अणुयुद्ध, रशिया, अँटी सॅटेलाईट वेपन, TWW, Third World War

रशियाच्या ‘पॅसिफिक फ्लीट’ने घेतलेल्या या चाचणीत बुलावा क्षेपणास्त्रांनी तब्बल पाच हजार किलोमीटर्स दूरवर असलेल्या वायव्य रशियातील लक्ष्य भेदल्याची माहिती देण्यात आली आहे. हा भाग युरोपिय देश फिनलंडपासून जवळ असल्याचे सांगण्यात येते. बुलावा अण्वस्त्राचा पल्ला आठ ते 10 हजार किलोमीटर असून ‘व्लादिमिर मोनोमॅख’ या पाणबुडीत 16 बुलावा अण्वस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. एकापाठोपाठ चार अण्वस्त्रे प्रक्षेपित होऊन त्यांनी नियोजित लक्ष्य भेदणे ही गोष्ट अणुयुद्धामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य सर्वनाशाची झलक दाखविणारी ठरते, असा दावा रशियन वृत्तवाहिनीने केला आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेने रशियाबरोबरील ‘आयएनएफ’ या क्षेपणास्त्र करारातून माघार घेतली होती. त्यापाठोपाठ येत्या दोन महिन्यात रशिया व अमेरिकेदरम्यान झालेल्या ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ची मुदत संपत आहे. प्रगत क्षेपणास्त्रे व अण्वस्त्रांची संख्या यावर नियंत्रण ठेवणाऱ्या या करारांचे रशियाकडून सातत्याने उल्लंघन होत असल्याचे आरोप अमेरिकेकडून करण्यात आले आहेत. मात्र रशियाने हे आरोप फेटाळले असून उलट आपल्या क्षमतेत वाढ करायची असल्याने करार संपविण्यासाठी अमेरिका प्रयत्न करीत असल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत आहे.

आंतरखंडीय अण्वस्त्रांची, चाचणी, ‘न्यूक्लिअर ट्रायड’, अण्वस्त्र, अणुयुद्ध, रशिया, अँटी सॅटेलाईट वेपन, TWW, Third World War

‘आयएनएफ’ची अखेर आणि ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’वर असलेले सावट या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून सातत्याने प्रगत अण्वस्त्रे तसेच क्षेपणास्त्रांच्या आधुनिक आवृत्त्यांच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच रशियाने अत्यंत प्रगत अशा हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या होत्या. त्यानंतर जून महिन्यात रशियाने नवी ‘न्यूक्लिअर डिटरंट पॉलिसी’ जाहीर करून अण्वस्त्रांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पारंपारिक प्रकारे केलेल्या हल्ल्याला अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला होता.

गेल्याच महिन्यात रशियाने ‘अँटी सॅटेलाईट वेपन’सह प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची माहिती दिली होती. यापाठोपाठ काही दिवसांपूर्वीच रशियाने ‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी करून आपली आण्विक क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info