इराणच्या राजधानीत स्फोटासह रेल्वे आणि सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ले

सायबर हल्ले

तेहरान – शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरान एका शक्तीशाली स्फोटाने हादरली. राष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या मुख्यालयाजवळील बागेत हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आधी व नंतर इराणच्या रेल्वे यंत्रणा आणि दोन सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ले झाले. यापैकी रेल्वेच्या घटनेत हॅकर्सनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा फोन नंबर सार्वजनिक केला. चार दिवसांपूर्वी इराणच्या कराज येथील गोदामाला संशयास्पदरित्या आग लागली होती.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तेहरानमधील मिल्लत पार्क या बागेत स्फोट झाला. पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाल्यामुळे जीवितहानी टळल्याचे इराणी यंत्रणांनी स्पष्ट केले. पण हा स्फोट कशामुळे झाला, यामागील कारण काय, या प्रश्‍नांची उत्तरे इराणी यंत्रणांनी दिलेली नाहीत. अज्ञात वस्तूचा स्फोट झाला असून तपास सुरू असल्याचे इराणचे उपपोलीस प्रमुख जनरल हमिद होदावंद यांनी सांगितले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/cyber-attacks-on-railways-and-government-websites-including-an-explosion-in-the-iranian-capital/