अफगाणिस्तानात तैनाती ठेवणार्‍या तुर्कीने गंभीर परिणामांसाठी तयार रहावे – तालिबानची धमकी

अफगाणिस्तानात तैनाती

काबुल – वारंवार इशारे देऊनही काबुलमधील सैन्यतैनातीवर ठाम असणार्‍या तुर्कीला आपल्या निर्णयासाठी गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तालिबानने दिली. गेल्या महिन्याभरात तालिबानने तुर्कीला तिसर्‍यांदा धमकावले. पण तुर्की काबुल विमानतळावरील आपल्या सैन्यतैनातीवर ठाम असल्याच्या बातम्या अमेरिकी माध्यमे देत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर नाटो सदस्य देशांनी तातडीने आपले जवान मायदेशी रवाना केले. पण तुर्कीने पुढील काही महिने आपले जवान राजधानी काबुलमध्ये तैनात असतील, अशी घोषणा केली. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असेल, असा दावा तुर्कीने केला.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/turkey-stationed-in-afghanistan-must-be-prepared-for-dire-consequences/