लेबेनॉनच्या रॉकेट हल्ल्यांना इस्रायली लष्कराचे प्रत्युत्तर

प्रत्युत्तर

जेरूसलेम – मंगळवारी लेबेनॉनच्या सीमेतून इस्रायलवर दोन रॉकेट हल्ले झाले. यानंतर इस्रायलच्या लष्कराने लेबेनॉनच्या हद्दीत तोफांचा मारा करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी चढविलेल्या या रॉकेट हल्ल्यांसाठी लेबेनॉन जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने ठेवला. त्याचबरोबर लेबेनॉनचे संकट इस्रायलसाठी धोका बनू देणार नसल्याची घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केली

लेबेनॉनमध्ये स्थिर सरकार स्थापन करण्याचे साद हरिरी यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे अस्थैर्य माजलेल्या लेबेनॉनमधील संकट अधिकच धोकादायक बनत असल्याचा व यापासून इस्रायलच्या सुरक्षेला धोका असल्याची चिंता पाश्‍चिमात्य विश्‍लेषक तसेच इस्रायल सरकारने गेल्या आठवड्यात व्यक्त केली होती.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/israeli-military-responds-to-lebanon-rocket-attacks/