चार महिन्यात 24 हजाराहून अधिक तालिबानी ठार व जखमी

तालिबानी ठार

काबुल – एप्रिल ते जुलै, अशा चार महिन्यांच्या कालावधीत अफगाणी लष्कराच्या कारवाईत 24 हजारांहून अधिक तालिबानी ठार व जखमी झाले. या कालावधीत 5,777 अफगाणींचा बळी गेला असून यामध्ये महिला आणि मुलांची संख्या मोठी असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या सरकारने दिली. दरम्यान, गेल्या चोवीस तासातील कारवाईत 226 तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.

अमेरिकेने सैन्यमाघार सुरू करण्याच्या आधीपासून अफगाण लष्कराने तालिबानविरोधात मोहिम छेडली होती. या चार महिन्यांच्या कालावधीत अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानवर सुमारे 22 हजार वेळा हल्ले चढविले. यामध्ये 24 हजारांहून अधिक दहशतवादी ठार झाले. कंदहार, हेल्मंड, पाकतिया, बघलान, हेरात या प्रांतात तालिबानला मोठी जीवितहानी सोसावी लागल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानच्या ‘पीस अफेअर्स’ मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती जाहीर केली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/more-than-24000-taliban-killed-and-wounded-in-four-months/