साऊथ चायना सीमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी नौदलाकडून क्षमता वाढविण्याच्या हालचाली

साऊथ चायना सीमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी नौदलाकडून क्षमता वाढविण्याच्या हालचाली

वॉशिंग्टन – चीनकडून साऊथ चायना सीमधील कारवायांची तीव्रता वाढत असून त्या रोखण्यासाठी अमेरिकी नौदलानेही आपल्या क्षमता वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या वर्षभरात अमेरिकी नौदलात ‘लेझर वेपन्स’, ‘सबमरिन ड्रोन्स’ व हायपरसोनिक मिसाईल्स सामील होतील, असा दावा अमेरिकी वेबसाईट्स तसेच संरक्षण विभागाशी निगडित माध्यमांकडून करण्यात आला आहे. यासाठी सुमारे पाच अब्ज डॉलर्सची आवश्यकता भासेल, असे सांगण्यात येते.

क्षमता वाढविण्याच्या हालचाली, कारवाया, अ‍ॅम्फिबियस वॉरशिप्स, साऊथ चायना सी, हालचालींना वेग, चीन, अमेरिका, अमेरिकी संसद, TWW, Third World War

गेल्या वर्षभरात चीनच्या नौदलाने साऊथ चायना सीसह ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात जोरदार कारवाया सुरू केल्या आहेत. चीनच्या युद्धनौका, पाणबुड्या, गस्ती नौका तसेच लढाऊ विमाने इतर देशांच्या हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न करीत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्याचवेळी चीनने साऊथ चायना सीमधील तळांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली असून हैनान भागात किमान तीन नवे तळ उभारण्यात आल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सवरून दिसून आले आहे. तळांबरोबरच पाणबुड्या, विनाशिका व ‘अ‍ॅम्फिबियस वॉरशिप्स’ची निर्मितीही वेगाने सुरू आहे. या युद्धनौकांसाठी नवी क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर्सही विकसित करण्यात येत आहेत.

क्षमता वाढविण्याच्या हालचाली, कारवाया, अ‍ॅम्फिबियस वॉरशिप्स, साऊथ चायना सी, हालचालींना वेग, चीन, अमेरिका, अमेरिकी संसद, TWW, Third World War

चीनच्या नौदलाने आकडेवारीच्या बाबतीत अमेरिकी नौदलाला मागे टाकून जगातील सर्वात मोठे नौदल होण्याचा मानही मिळविला आहे. चीनच्या नौदलाचा विस्तार व वाढत्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकी नौदलानेही आपल्या हालचालींना वेग दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी नौदलाने पुढील तीन दशकांसाठीची योजना जाहीर केली होती. त्यात पुढील दशकभरात अमेरिकेतील युद्धनौकांची संख्या ३४७पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याचवेळी पाणबुड्या व ड्रोन्सची संख्या वाढविण्याचे संकेतही देण्यात आले होते. यादृष्टीने अमेरिकी नौदलाने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचा दावा ‘द नॅशनल इंटरेस्ट’ या वेबसाईटवर करण्यात आला आहे.

क्षमता वाढविण्याच्या हालचाली, कारवाया, अ‍ॅम्फिबियस वॉरशिप्स, साऊथ चायना सी, हालचालींना वेग, चीन, अमेरिका, अमेरिकी संसद, TWW, Third World War

अमेरिकेचे वरिष्ठ नौदल अधिकारी अ‍ॅडमिरल मायकल गिल्डे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात, नौदलाने नव्या पाणबुड्यांसह हायपरसोनिक मिसाईल्स व लेझर यंत्रणांसाठी प्रयत्न सुरू केल्याचे वक्तव्य केले आहे. या सर्वांच्या खरेदीसाठी सुमारे पाच अब्ज डॉलर्सचा निधी लागेल, असेही त्यांनी सांगितले. पुढील काही वर्षात अमेरिकी नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका तसेच ‘अ‍ॅम्फिबियस वॉरशिप्स’वर लेझर यंत्रणा तैनात असतील, असे संकेत देण्यात आले आहेत.

‘द वॉर झोन’ या संरक्षणविषयक वेबसाईटने दिलेल्या माहितीत, ‘अंडरवॉटर ड्रोन्स’च्या योजनेला वेग देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ही ड्रोन्स ‘स्नेकहेड प्रोग्राम’अंतर्गत विकसित करण्यात येत असून आण्विक पाणबुड्यांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. त्याव्यतिरिक्त नव्या ‘डिफेन्स बजेट’मध्ये नौदलाने तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मानवरहित युद्धनौकांची मागणी केल्याचेही समोर आले आहे. अमेरिकी संसदेने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात याचा उल्लेख आहे. सध्या पाच मोठ्या मानवरहित युद्धनौकांची उभारणी सुरू असल्याचेही यात सांगण्यात आले आहे.

अमेरिकी नौदलासाठी ‘कन्व्हेंशनल प्रॉम्प्ट स्ट्राईक’(सीपीएस) नावाचे स्वतंत्र हायपरसोनिक क्षेपणास्त्रही विकसित करण्यात येत आहे. यासंदर्भातील कंत्राट अमेरिकेच्या ‘लॉकहिड मार्टिन’ या आघाडीच्या कंपनीला देण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी नौदलातील सर्व ‘गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर्स’वर हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येतील, असा दावा केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info