कोरोनाच्या साथीमागे ‘वुहान लॅब’च असल्याचे कितीतरी पुरावे आहेत – अमेरिकी संसदेतील ‘रिपब्लिकन’ सदस्यांचा अहवाल

‘वुहान लॅब’

वॉशिंग्टन – कोरोनाची साथ पसरण्यामागे चीनमधील ‘वुहान लॅब’च कारणीभूत असल्याचे कितीतरी पुरावे उपलब्ध आहेत, अशा स्वरुपाचा अहवाल अमेरिकी संसदेतील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी दिला आहे. अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहातील ‘हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटी’चे सदस्य माईक मॅक्कॉल यांनी सदर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात, कोरोनाच्या उगमाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वुहानमधील मार्केट कोरोनाचा उगम आहे, हा पर्याय आता पूर्णपणे फेटाळला जाण्याची गरज आहे. १२ सप्टेंबर, २०१९ पूर्वी कधीतरी कोरोनाचा विषाणू वुहान लॅबमधून बाहेर पडल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असेही अहवालात निदर्शनास आणण्यात आले आहे. २०१९ साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/theres-a-lot-of-evidence-that-coronas-accomplice-is-wuhan-lab/