येमेनमधील संघर्षात हौथींचे 40 बंडखोर ठार

40 बंडखोर ठार

अलेक्झांड्रीया – येमेनचे लष्कर आणि हौथी बंडखोर यांच्यात मारिब प्रांतात पेटलेल्या संघर्षात किमान 40 बंडखोर ठार झाल्याचे वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन केले जाणारे संघर्षबंदीचे आवाहन धुडकावणार्‍या हौथी बंडखोरांवर येमेनच्या लष्कराने हवाई हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. दरम्यान, इराणसंलग्न हौथी बंडखोर संघर्षासाठी ‘चाईल्ड सोल्जर’ना प्रशिक्षण देत असून याचे भयंकर परिणाम समोर येतील, असा इशारा येमेनच्या सरकारने दिला.

गेल्या चोवीस तासात येमेनच्या लष्कराने इंधनसंपन्न मारिबसह लहज, जौफ आणि अल-बेदा या प्रांतातील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर कारवाई केली. यापैकी मारिब प्रांताच्या रहाबाह जिल्ह्यात लष्कराच्या कारवाईत किमान 40 बंडखोर ठार झाले. या डोंगराळ भागातील कारवाईसाठी आखाती देशांच्या हवाईदलाने येमेनच्या लष्कराला सहाय्य केले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/40-houthi-rebels-killed-in-clashes-in-yemen/