महागाई रोखण्यासाठी व्हेनेझुएलाकडून चलनातील सहा शून्य कमी करण्याची योजना

महागाई

कॅराकस – सतत सहा वर्षे मंदीत असणारी अर्थव्यवस्था व वर्षभरात तब्बल दोन हजार टक्क्यांनी वाढलेली महागाई यावर उपाय म्हणून आपल्या चलनव्यवस्थेतील सहा शून्य कमी करण्याची योजना व्हेनेझुएला सरकारने मांडली आहे. या योजनेनुसार, ऑक्टोबर महिन्यापासून १०० बोलिव्हरची नोट सर्वाधिक रक्कम ठरणार असून त्याचे प्रत्यक्षातील मूल्य १० कोटी बोलिव्हर असणार आहे. याबरोबरच व्हेनेझुएलाची मध्यवर्ती बँक डिजिटल करन्सी सुरू करणारी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

२०१८ सालापासून व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना व इतर जागतिक संघटनांनी दिलेल्या विविध अहवालांनुसार, व्हेनेझुएलात अराजकसदृश परिस्थिती असून जवळपास ५० लाख नागरिकांनी देश सोडल्याचे सांगण्यात येेते. गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले असून त्यामुळे इंधनक्षेत्र, पर्यटन, खनिज क्षेत्र या सर्वांची वाताहत झाल्याचे मानले जाते.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/venezuela-plans-to-devalue-the-currency-by-six-zeros-to-curb-inflation/