रशियाने प्रगत शस्त्रांनी सज्ज असलेला उपग्रह प्रक्षेपित केला

अमेरिकेच्या स्पेस फोर्सचे प्रमुख जनरल रेमंड यांचा इशारा

वॉशिंग्टन – रशियाने अंतराळातील पृथ्वीच्या कक्षेत ‘आर्म्ड् सॅटेलाईट’ अर्थात प्रगत शस्त्रांनी सज्ज असलेला उपग्रह प्रक्षेपित केला असून हा उपग्रह अमेरिकेसाठी धोका असल्याचा इशारा ‘युएस स्पेस फोर्स’चे प्रमुख जनरल जॉन रेमंड यांनी दिला. एखाद्या शस्त्राचे बाह्य आवरण असावे, अशा रितीने रशियाने उपग्रहाची रचना केली आहे, असेही रेमंड यांनी बजावले. गेल्यावर्षीही रशियाने अंतराळातील उपग्रहाद्वारे दुसर्‍या उपग्रहाला उडविता येईल, अशा प्रकारच्या यंत्रणेची चाचणी घेतल्याचे उघड झाले होते.

शस्त्रांनी सज्ज्ज,

एप्रिल महिन्यात, अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने सुरक्षाविषयक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात रशियाकडे असलेले तंत्रज्ञान व क्षेपणास्त्रांचा अमेरिकी उपग्रहांना धोका असल्याचे बजावण्यात आले होते. गेल्या काही महिन्यात रशियाकडून दोनदा अंतराळात उपग्रहांना भेदण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जनरल रेमंड यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

जनरल रेमंड यांनी ‘एअर स्पेस सायबर कॉन्फरस’मध्ये हा इशारा दिला आहे. रशियाने ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये उपग्रह प्रक्षेपित केला असून त्यातील यंत्रणा प्रगत शस्त्रांनी सज्ज आहे, याकडे अमेरिकी अधिकार्‍यांनी लक्ष वेधले. रशियाच्या या यंत्रणा दूरसंचार तसेच संरक्षणदलांच्या ‘कमांड ऍण्ड कंट्रोल’साठी आवश्यक असणार्‍या अमेरिकी उपग्रहांना नष्ट करु शकतात, असे जनरल रेमंड यांनी बजावले. रशियाने एखाद्या बाह्य आवरणाचा भास होईल, अशा रितीने उपग्रहाची रचना केल्याचेही त्यांनी सांगितले.

शस्त्रांनी सज्ज्ज

रशिया तसेच चीन हे दोन्ही देश अंतराळक्षेत्रात आक्रमक हालचाली करीत असल्याचे गेल्या काही वर्षात समोर येत आहे. गेल्या वर्षभरात रशियाने अंतराळात शस्त्रांसारखा वापर करता येईल, अशा प्रकारचे उपग्रह तैनात केले आहेत. त्याचवेळी दुसरा उपग्रह उडविता येईल, अशा रितीने रशियाच्या एका उपग्रहाने हालचाली केल्याची घटनाही समोर आली होती. अमेरिका व ब्रिटनने या घटनेवर टीकास्त्र सोडताना, अत्यंत धोकादायक प्रकार असा उल्लेख केला होता. रशियाने पृथ्वीवरून अंतराळातील उपग्रह उडविता येतील, अशी क्षेपणास्त्रेही विकसित केली आहेत. गेल्या काही महिन्यात रशियाने अशा क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्याचेही समोर आले आहे.

रशियाच्या या वाढत्या धोक्यावर ब्रिटनकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रशियाच्या अंतराळातील कारवाया हा अंतराळक्षेत्रासाठी वाढता धोका ठरत असल्याचा इशारा ब्रिटीश संरक्षणदलांच्या अधिकार्‍यांनी काही आठवड्यांपूर्वी दिला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info