किव्ह/वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच त्यात अमेरिका व ब्रिटनच्या ‘स्पेशल फोर्सेस’ सहभागी आहेत, असा दावा आघाडीचे फ्रेंच दैनिक ‘ले फिगारो’ने केला आहे. दोन्ही देशांनी युक्रेनच्या युद्धात आपण थेट सहभागी होणार नाही व आपले जवान युक्रेनमध्ये लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर फ्रेंच दैनिकाने उघड केलेली ही माहिती धक्कादायक ठरू शकते. याआधी अमेरिकेशी संलग्न असलेले कंत्राटी जवान युक्रेनच्या बाजूने युद्ध करीत असून यात अल कायदा व इतर संघटनांच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे आरोप रशियाने केले होते.
‘ले फिगारो’चे आघाडीचे पत्रकार जॉर्ज मॅल्ब्रुनो यांनी एका ट्विटच्या माध्यमातून हा दावा करून फ्रेंच गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. शनिवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन युक्रेनची राजधानी किव्हमध्ये असतानाच ही माहिती समोर आली आहे. रशियाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनविरोधात लष्करी कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सुरू करण्यापूर्वी अनेक महिन्यांपासून अमेरिका, ब्रिटन व नाटो सदस्य देशांची निवडक लष्करी पथके युक्रेनमध्ये सक्रिय झाली होती. युक्रेनी लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी ही पथके तैनात केल्याचे संबंधित देशांकडून सांगण्यात आले होते. रशिया-युक्रेन युद्धाची शक्यता वाढल्यानंतर अशा पथकांना माघारी परतण्याचे निर्देश देण्यात आले होते.
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच त्यात अमेरिका व ब्रिटनच्या ‘स्पेशल फोर्सेस’ सहभागी आहेत, असा दावा आघाडीचे फ्रेंच दैनिक ‘
पत्रकार जॉर्ज मॅल्ब्रुनो यांनी आपल्या ट्विटमध्येही याचा उल्लेख केला आहे. फ्रेंच गुप्तचर यंत्रणांचा हवाला देत, ब्रिटनची ‘एसएएस युनिट’ तसेच अमेरिकेचा ‘डेल्टा फोर्स’ ही पथके युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासून युक्रेनमध्ये सक्रिय आहेत, असे मॅल्ब्रुनो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या दाव्यामुळे अमेरिका व ब्रिटन रशिया-युक्रेन युद्धात थेट सहभागी झाल्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही देशांनी आपले जवान रशियाविरोधातील युद्धात सहभागी होणार नाही, असे जाहीर केले होते. असे असतानाही त्यांच्या ‘स्पेशल फोर्सेस’चा सहभाग या देशांचा दुटप्पीपणा उघड करणारा ठरतो, असा दावा रशियन माध्यमांनी केला आहे.
युक्रेन युद्धात अमेरिकेसह बहुतांश नाटो सदस्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहाय्य पुरविले होते. अमेरिका व ब्रिटन यात आघाडीवर असले तरी लाटव्हिया, स्लोव्हाकिया यासारख्या छोट्या देशांनीही युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य केले आहे. स्लोव्हाकियाने युक्रेनला रशियन बनावटीची ‘एस-३००’ क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविली होती. काही दिवसांपूर्वी रशियाने कॅलिबर क्रूझ मिसाईलचा वापर करून ही यंत्रणा नष्ट केल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, रशियाच्या चेचेन रिपब्लिकचे प्रमुख रमझान कादिरोव्ह यांनी, रशियन फौजा पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला चढवतील, असा इशारा दिला आहे. रशियाची संरक्षणदले माघार घेणार नाहीत, उलट मारिपोल व किव्हवर हल्ले चढविले जातील असे कादिरोव्ह यांनी म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |