चीन हल्ल्याची तयारी करीत असतानाच तैवानला वेळेत शस्त्रे पुरविण्यास अमेरिकेचा नकार

तैपेई – युक्रेनवर रशियाने चढविला, तसाच हल्ला आपण तैवानवर चढविल्यास, परदेशातील आपल्या मालमत्तेचे रक्षण कसे करायचे, यावर चीन विचार करीत आहे. यासाठी चीनने आपल्या देशातील व परदेशी बँकांची बैठक आयोजित केली होती. अशारितीने चीन तैवानवर आक्रमणाची तयारी करीत असताना, अमेरिकेने तैवानला हॉवित्झर तोफा व संरक्षणसाहित्य वेळेस पुरविण्यास नकार दिला. ऐनवेळी अमेरिकेने दिलेला हा नकार तैवानच्या संरक्षणसिद्धतेवर परिणाम करणारा असून ही बाब चीनच्या पथ्यावर पडणारी ठरते.

शस्त्रे पुरविण्यास

अमेरिकेने तैवानला सुमारे 7.5 कोटी डॉलर्सची शस्त्रास्त्रे पुरविण्याचा निर्णयघोषित केला होता. यामध्ये 40 ‘155 एमएम’ एम109ए6 हॉवित्झर तोफांचा समावेश होता. या तोफांमुळे तैवानची मारकक्षमता वाढणार होती. गेल्या वर्षी अमेरिकेने ही घोषणा करून आपण तैवानच्या सुरक्षेसाठी बांधिल असल्याची जाणीव चीनला करून दिली होती. पण चीनच्या आक्रमणाचा धोका वाढलेला असताना, अमेरिकन कंपन्यांनी तैवानला ही मागणी इतक्यात पूर्ण करता येणार नाही, असे कळविले आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर, अमेरिका व नाटोचे सारे लक्ष युक्रेनच्या युद्धाकडे केंद्रीत झालेले आहे. यामुळे तैवानवर आक्रमण करण्यासाठी उत्तम संधी चीनकडे चालून आलेली आहे. ही संधी साधण्याची जोरदार तयारी चीनने केल्याचे इशारे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिले आहेत. चीनची लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत वारंवार घुसखोरी करून तैवानच्या युद्धसज्जतेचा अंदाज घेत आहेत. असे असताना अमेरिका तैवानला केवळ तोंडी आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहे.

शस्त्रे पुरविण्यास

जपानचे माजी पंतप्रधान ॲबे शिंजो यांनी काही आठवड्यांपूर्वी बायडेन प्रशासनाच्या तैवानविषयक धोरणावर खरमरीत टीका केली होती. तैवानबाबतचे बायडेन प्रशासनाचे धोरण धरसोडीचे असल्याचा ठपका जपानच्या माजी पंतप्रधानांनी ठेवला होता. त्यानंतरही बायडेन प्रशासनाच्या धोरणात विशेष फरक पडलेला नाही. उलट चीनचा आत्मविश्वास वाढविणारी पावले उचलण्याचे काम बायडेन प्रशासनाने केले आहे. तैवानला आवश्यक असलेल्या तोफा व इतर शस्त्रास्त्रे इतक्यात पुरविता येणार नाही, असे सांगून अमेरिकेने तैवानचा विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे.

अशा परिस्थितीत आपला देश या शस्त्रांसाठी इतर पर्यायांचा विचार करू, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. याचे तपशील तैवानने जाहीर केलेले नाहीत. मात्र या देशाला लवकरात लवकर या तोफा मिळविण्यासाठी हालचाली कराव्या लागतील. चीनच्या हल्ल्याची शक्यता बळावलेली असताना, तैवानने आपला देश म्हणजे युक्रेन नाही व चीन म्हणजे रशिया नाही, याची जाणीव करून दिली होती. त्याचवेळी जपाननेही तैवानवरील चीनचे आक्रमण म्हणजे आपल्या देशावरील हल्ला मानला जाईल, असे बजावले आहे. त्यामुळे तैवानवर हल्ला चढवून तैवानचा ताबा घेणे चीनसाठी तितकेसे सोपे राहिलेले नाही. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली अमेरिका तैवानच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे, ही बाब चीनला फार मोठे उत्तेजन देणारी ठरते. याच्या बळावर चीन तैवानचा घास गिळण्याचा निर्णय घेऊ शकतो.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info