पूर्व युक्रेनमध्ये केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात युक्रेनचे २०० जवान ठार

- रशियाच्या संरक्षण विभागाचा दावा

क्षेपणास्त्र

मॉस्को/किव्ह – बुधवारी युक्रेनच्या डिनिप्रोपेोव्हस्क प्रांतात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनी लष्कराचे २००हून अधिक जवान मारले गेल्याची माहिती रशियाच्या संरक्षणविभागाने दिली. या हल्ल्यात पूर्व युक्रेनमधील डोन्बास प्रांतात पाठविण्यात येणारा मोठा शस्त्रसाठाही नष्ट केल्याचे रशियाने सांगितले. याव्यतिरिक्त रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक आघाडीच्या शहरांवर हल्ले चढविल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. दरम्यान, झॅपोरिझिआ अणुप्रकल्पाला भेट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक लवकरच दाखल होईल, असे संकेत सूत्रांकडून देण्यात आले आहेत.

बुधवारी युक्रेनचा ३१वा स्वातंत्र्यदिन होता. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशिया मोठे हल्ले करेल, असा इशारा आधीच देण्यात आला होता. डिनिप्रोपेोव्हस्क प्रांतातील चॅप्लिन शहरावर झालेला हल्ला त्याला दुजोरा देणारा ठरतो. या शहरातील रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ‘मिलिटरी ेन’ला लक्ष्य केल्याची माहिती रशियाने दिली. हल्ल्यासाठी रशियाने इस्कंदर क्षेपणास्त्रांचा वापर केला.

जवान

दोन इस्कंदर क्षेपणास्त्रांनी ेनसह रेल्वे स्टेशन व परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे समोर आले. युक्रेनचे २००हून अधिक जवान हल्ल्यात मारले गेले आहेत. तसेच शस्त्रसाठा असलेली १० युनिट्स उद्ध्वस्त झाल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. मात्र युक्रेनने या हल्ल्यात २५ जणांचा बळी गेल्याचा दावा केला. त्यात लहान मुले व नागरिकांचा समावेश असल्याचेही युक्रेनी यंत्रणांनी स्पष्ट केले. त्याचवेळी जीवितहानीचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली आहे.

जवान

चॅप्लिन शहराव्यतिरिक्त रशियाने राजधानी किव्ह, खार्किव्ह, मायकोलेव्ह, डिनिप्रो या शहरांवरही हल्ले केल्याची माहिती युक्रेनने दिली. दरम्यान, झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पाला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक लवकरच भेट देईल, असे संकेत मिळाले आहेत. आयोगाचे प्रमुख रफाएल ग्रॉसी यांनी यासंदर्भात माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. रशियाने आयोगाकडे युक्रेनी हल्ल्यांची माहिती देणारे पुरावे सादर केल्याचेही समोर आले.

झॅपोरझिआ हा युक्रेनमधील सर्वात मोठा अणुप्रकल्प असून त्याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकल्पाच्या परिसरात होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. याबाबत रशिया व युक्रेन या दोन्ही देशांनी परस्परांवर आरोप केले आहेत. युक्रेनने रशिया ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ करीत असल्याचा ठपका ठेवला. तर रशियाने अणुप्रकल्पात दुर्घटना घडल्यास त्याचे परिणाम युरोपसह जगाला भोगावे लागतील, असे बजावले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info