रशियाने पूर्व व दक्षिण युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविली

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रापाठोपाठ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये रशियाने आक्रमक हल्ले सुरू केले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये डोन्बासमधील शहरांबरोबरच दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह भागात रशियाकडून क्षेपणास्त्रे व तोफांचा जोरदार मारा करण्यात आला. त्याचवेळी ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रातून युक्रेनच्या ‘माऊंटन ब्रिगेड’वर ‘कॅलिबर’ क्षेपणास्त्रे डागल्याची माहितीही रशियन संरक्षणदलांनी दिली आहे.

दक्षिण युक्रेनमधील

गेल्या महिन्यात रशियाने आपल्या युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाल्याची घोषणा केली होती. या टप्प्यात डोन्बासपासून मोल्दोव्हाच्या सीमेपर्यंतचा भाग ताब्यात घेण्याचे संकेत रशियाकडून देण्यात आले होते. त्यासाठी रशियन फौजा सर्वशक्तिनिशी प्रयत्न करीत असल्याचे समोर येत आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढविण्यात येत असून महत्त्वाची शहरे ताब्यात घेण्यासाठी तोफा, रणगाडे, रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा अविरत मारा सुरू आहे.

दक्षिण युक्रेनमधील

डोन्बास क्षेत्रातील लुहान्स्क व डोनेत्स्क या दोन्ही प्रांतांवर पूर्ण ताबा मिळविण्यासाठी रशियाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी मारिपोलमध्ये तैनात केलेल्या अनेक तुकड्या डोन्बासमध्ये हलविण्यात आल्या आहेत. त्याचवेळी ‘लेझर वेपन्स’ व प्रगत रणगाडेही तैनात करण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. रशियन फौजा येत्या एक-दोन दिवसात लुहान्स्क प्रांतातील सेव्हेरोडोनेत्स्क शहराचा ताबा घेऊ शकतात, असा दावा स्थानिक सूत्रांकडून करण्यात आला आहे.

डोन्बासच्या ताब्यासाठी रशियन संरक्षणदले ‘स्कॉर्च्ड अर्थ टॅक्टिक’ वापरत असल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला. तोफा, रणगाडे व रॉकेट्सचा मारा करून शहरांना भाजून काढत बेचिराख केले जात आहे, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दर दिवशी डोन्बासमधील संघर्षात जवळपास 100 जणांचा बळी जात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने खार्किव्ह शहरातून रशियन फौजांना बाहेर लोटल्याचा दावा केला होता. मात्र रशियाने हे शहर ताब्ात घेण्यासाठी पुन्हा हल्ले सुरू केले आहेत.

दक्षिण युक्रेनमधील

खार्किव्हबरोबरच दक्षिण युक्रेनचा भाग असलेल्या मायकोलेव्ह व नजिकच्या भागातही क्षेपणास्त्र तसेच हवाईहल्ले करण्यात आले. यात युक्रेन लष्कराची कमांड सेंटर्स तसेच शस्त्रांची कोठारे लक्ष्य करण्यात आली. रशियाने अमेरिकी हॉवित्झर्स निष्प्रभ केल्याचा दावाही संरक्षणदलांच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आला.

रशियाकडून ओडेसा बंदराजवळही मोठे हल्ले सुरू असल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने ‘ओडेसा’ची कोंडी फोडण्यासाठी युक्रेनला सहाय्य करावे, अशी मागणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. ओडेसा बंदर व शहरावर युक्रेनचा ताबा असला तरी ब्लॅक सी क्षेत्रात रशियन नौदलाच्या मोठ्या तैनातीमुळे सागरी वाहतुकीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे युक्रेनचे लाखो टन अन्नधान्य व इतर उत्पादने अडकून पडली आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info