मॉस्को/किव्ह – पाश्चिमात्यांकडून लादण्यात येणारे निर्बंध व नाटोकडून सुरू असलेला विस्तार या पार्श्वभूमीवर रशिया आणि बेलारुसच्या एकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात आल्याचा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. गेल्या आठवड्याभरात पुतिन व बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांची दोनदा भेट झाली असून त्यात एकीकरणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह तसेच संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनीही बेलारुसला नुकतीच भेट दिली होती. या भेटीगाठी सुरू असतानाच रशिया युक्रेनचा वापर करून अण्वस्त्र डागू शकतो, असा दावा ब्रिटीश दैनिकाने केला आहे.
गेल्या आठवड्यात बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी रशियाला भेट दिली होती. त्यानंतर काही दिवसांच्या अवधीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन बेलारुसमध्ये दाखल झाले आहेत. पुतिन यांच्या भेटीपूर्वी रशियाच्या इतर नेत्यांनीही बेलारुसचा दौरा केला होता. या सर्व हालचाली रशिया व बेलारुसच्या एकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्याचे संकेत असल्याचे मानले जाते. पुतिन यांनी शुक्रवारी केलेले वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरले आहे.
यापूर्वी 1997 साली रशिया व बेलारुस यांच्यात व्यापक सहकार्य करार झाला होता. त्यानंतर अनेकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना बेलारुस रशियात सामील करायचा आहे, अशा स्वरुपाची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. मात्र दोन्ही देशांकडून सदर दाव्यांचे खंडन करण्यात आले होते. गेल्या वर्षी बेलारुसमध्ये झालेल्या बंडानंतर पुतिन यांनी बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांचे समर्थन केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा रशिया बेलारुस एकीकरणाच्या चर्चांना तोडं फुटले होते.
बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाकडून अण्वस्त्रांसह अनेक प्रगत संरक्षणयंत्रणांची मागणी केली होती. रशिया-युक्रेन युद्धातही बेलारुसने रशियाच्या बाजूने उभे असल्याचे जाहीर केले होते. युक्रेनकडूनही बेलारुसच्या माध्यमातून रशिया हल्ला चढवेल, असे दावे करण्यात आले होते. त्यानंतर बेलारुसने रशियाची लष्करी तैनाती तसेच अण्वस्त्रांना परवानगीदिल्याने ही शक्यता अधिकच बळावली आहे.
दरम्यान, रशियाने शुक्रवारी युक्रेनच्या ओडेसा शहराव जोरदार क्षेपणास्त्रहल्ले चढविल्याचे समोर आले आहे. यात 19 जणांचा बळी गेल्याची माहिती युक्रेनच्या यंत्रणांनी दिली.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |