युक्रेनवर नव्या जबरदस्त हल्ल्यांसाठी रशियाची तयारी

रशियाची तयारी

मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील लष्करी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याची तयारी रशियाकडून सुरू झाली आहे. पूर्व व दक्षिण युक्रेनमधील प्रांतांनंतर आता मध्य युक्रेनच्या क्षेत्रावर हल्ले करण्याची योजना आखण्यात येत असल्याचा दावा युक्रेनने केला. युक्रेनचे राष्ट्रायक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे जन्मस्थान असलेल्या ‘क्रिव्हयि रिह’ शहरासह डिनिप्रोपेोव्हस्क प्रांतावर हल्ले करण्यात येतील, असे या दाव्यात सांगण्यात आले. त्यासाठी रशियाने ‘मिलिटरी स्ाईक फोर्स’ची उभारणी केल्याचेही युक्रेनने बजावले आहे. युक्रेनकडून हा दावा समोर येत असतानाच रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनबरोबर शांतीकरारासाठी तयार असल्याचे वक्तव्य रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केले.

एप्रिल महिन्यात रशियाने युक्रेनमधील मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केल्याची घोषणा केली होती. या टप्प्यात उत्तरेकडील खार्किव्हपासून ते दक्षिणेतील ओडेसापर्यंतच्या क्षेत्रावर ताबा मिळविणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले होते. या टप्प्यातील नियोजित क्षेत्रापैकी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक भाग रशियाच्या नियंत्रणाखाली आल्याचे मानले जाते. युक्रेनमधील या क्षेत्रावर ताबा मिळवून रशिया आपली मोहीम थांबवेल, असे दावे विश्लेषक तसेच माध्यमांकडून करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रशियन नेतृत्त्वाकडून वेगळे संकेत देण्यात येत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात युक्रेनमधील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळविणे तसेच युक्रेनमधील राजवटीत बदल घडविणे यासंदर्भातील वक्तव्यांचा समावेश होता.

रशियाची तयारी

युक्रेनच्या यंत्रणांकडून देण्यात येणारी नवी माहिती त्याला दुजोरा देणारी दिसते. दक्षिण व मध्य युक्रेनचा भाग असणाऱ्या डिनिप्रोपेोव्हस्क प्रांतावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. नागरी वस्त्या व पायाभूत सुविधांचा यात समावेश असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे होमटाऊन असलेले ‘क्रिव्हयि रिह’ या शहरासह प्रांतावर ताबा मिळवून युक्रेनच्या राजवटीला मोठा धक्का देण्याचा प्र्रयत्न रशिया करेल, असे सांगण्यात येते. त्यासाठी रशियाने मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू केल्या असून ‘मिलिटरी स्ाईक फोर्स’ची उभारणी केल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रशियाची तयारी

युक्रेनकडून नवे दावे समोर येत असतानाच रशियाने शांतीकरारासंदर्भात वक्तव्य करून लक्ष वेधून घेतले आहे. ‘रशिया कधीही युक्रेनबरोबर शांतीकरार करण्यासाठी तयार आहे. युक्रेनला रशियाची अटी माहित आहेत, त्या मान्य करून युक्रेन सध्या सुरू असणारा संघर्ष थांबवू शकतो’, असे रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सांगितले. यापूर्वी मार्चमध्ये होणारा शांतीकराराचा प्रयत्न युक्रेनने उधळून लावल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, युक्रेनमध्ये सुरू असणारा संघर्षाने युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वाधिक धोकादायक स्थिती निर्माण केली आहे, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. रशियाला कोणत्याही स्थितीत या संघर्षात विजयी होऊ देता कामा नये व त्यासाठी नाटो सदस्य देशांना दीर्घकाळपर्यंत युक्रेनला सहाय्य पुरवावे लागेल, असा दावाही स्टॉल्टनबर्ग यांनी केला. युक्रेनमध्ये जे काही घडते आहे ते फारच वाईट आहे, पण रशिया व नाटोत युद्ध भडकल्यास परिस्थिती अधिक भयानक असेल, असे नाटोच्या प्रमुखांनी बजावले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info