किव्ह – रशिया व युक्रेनमधील युद्ध युक्रेनच्या झ्ापोरिएशामधील अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत येऊन ठेपले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या क्षेपणास्त्र व रॉकेट्सच्या माऱ्याच्या टप्प्यात झ्ापोरिएशामधील अणुऊर्जा प्रकल्प येईल आणि युरोपातील या सर्वात मोठ्या अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग सुरू होईल, अशी भयंकर शक्यता वर्तविली जात आहे. युक्रेनी लष्कराच्या माऱ्यामुळे या अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग सुरू झ्ााला असता, असा आरोप रशियाने केला आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झ्ोलेन्स्की यांनी इथे आण्विक दुर्घटना घडलीच, तर त्याची संपूर्ण जबाबदारी रशियाचीच असेल, असा इशारा दिला आहे.
युक्रेनचे युद्ध आता वेगळ्याच टप्प्यावर येऊन ठेपले आहे, असा दावा ब्रिटनच्या लष्करी गुप्तचर विभागाने केला. झ्ापोरिएशामधील अणुऊर्जा प्रकल्प दोन्ही देशांमधील युद्धाच्या टप्प्यात आला असून याचे भयंकर परिणाम संभवतात, याची जाणीव ब्रिटनच्या ‘मिलिटरी इंटेलिजन्स’ने करून दिली. रशियन लष्कराने यासंदर्भात माहिती देताना युक्रेनच्या लष्कराने बेजबाबदारपणे केलेल्या माऱ्यामुळे झ्ापोरिएशामधील अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग सुरू झ्ााला असता, पण सुदैवाने तसे घडले नाही, असे बजावले आहे. तर युक्रेन यासाठी रशियालाच जबाबदार धरत आहे. या ठिकाणी आण्विक दुर्घटना घडली आणि त्यामुळे नरसंहार झ्ााला तर त्याची जबाबदारी ही पूर्णपणे रशियावरच असेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झ्ोलेन्स्की यांनी बजावले आहे.
झ्ापोरिएशामधील या अणुऊर्जा प्रकल्पाची जबाबदारी रशियाचीच आहे आणि या अणुप्रकल्पाला रशियाकडूनच धोका संभवतो, ही केवळ युक्रेनच नाही तर साऱ्या युरोपसाठी भयंकर बाब ठरू शकते, असे राष्ट्राध्यक्ष झ्ोलेन्स्की पुढे म्हणाले. रशियाच्या आण्विक दहशतवादाचा हा आणखी एक पुरावा ठरतो, असे सांगून झ्ोलेन्स्की यांनी यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने रशिया निर्बंध लादावे, असे आवाहन झ्ोलेन्स्की यांनी केले आहे.
रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, रशियाने झ्ापोरिएशामधील या अणुप्रकल्पाचा ताबा घेतला होता. त्यामुळे याच्या संरक्षणाची जबाबदारी सध्या रशियावरच आहे. मात्र युक्रेनी लष्कराच्या माऱ्यामुळे हा प्रकल्प धोक्यात आल्याची बाब रशिया लक्षात आणून देत आहे.
रशिया व युक्रेन यासंदर्भात परस्परांवर आरोप करीत असताना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इथली परिस्थिती अनिश्चित असल्याचे सांगून त्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. यात एक लाख, 40 हजाराहून अधिकजणांचा बळी गेला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने नागासाकी या जपानच्या दुसऱ्या शहरावर अणुबॉम्बचा प्रयोग करून 70 हजार जणांचा बळी घेतला. याची आठवण संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी करून दिली. पहिल्या आण्विक हल्ल्याला 77 वर्ष पूर्ण होत असताना, जगाला अजूनही अणुहल्ल्याच्या भयंकर परिणामांची जाणीव झ्ाालेली नाही, अशी खंत गुतेरस यांनी व्यक्त केली आहे.
ज्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत, असे देश अणुहल्ल्याची भाषा कसे काय करू शकतात, असा सवाल गुतेरस यांनी केला आहे. याबरोबरच जग लोडेड गन अर्थात भरलेल्या बंदुकीशी खेळ करीत आहे, असे सांगून अणुयुद्धाच्या धोक्याचा गुतेरस यांनी उल्लेख केला. युक्रेनच्या झ्ापोरिएशामधील अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला धोका प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |