नाटोत सहभागी होण्याचे नाकारले तरी युक्रेनवरील रशियाचे हल्ले थांबणार नाहीत

- रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांची घोषणा

मॉस्को – युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊ नये, अशी अट रशियाने या देशावर हल्ला चढविण्यापूर्वीच घातली होती. रशियाची ही मागणी आता युक्रेनने मान्य केली, तरीही या देशावरील रशियाचे हल्ले थांबणार नाहीत. कारण आता युक्रेनमधील आपली उद्दिष्टे साध्य झाल्याखेरीज रशिया हे युद्ध थांबविणार नाही, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह यांनी दिला आहे. ‘डीनाझीफिकेशन ऑफ युक्रेन’ अर्थात नाझीवादाच्या तावडीतून युक्रेनला सोडविणे हे रशियाच्या लष्करी कारवाईचे ध्येय असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले होते. मेदवेदेव्ह त्याचाच दाखला देत असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

रशियाचे हल्ले

रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व रशियाच्या ‘सिक्युरिटी काऊन्सिल’चे उपाध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिमित्री मेदवेदेव्ह गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमधील युद्धाबाबत निर्णायक इशारे देत आहेत. युक्रेनचे युद्ध थांबवायचे असेल, तर राजधानी किव्हमध्ये युक्रेनी लष्कराने बंड करून सत्ता हस्तगत करावी. त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी रशियाबरोबर वाटाघाटी सुरू कराव्या, असा एक पर्याय मेदवेदेव्ह यांनी शुक्रवारी दिला होता.

हे व्हायचे नसेल, तर युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमिर झ्ोलेन्स्की यांनी आपल्या धोरणात बदल करून रशियाचे म्हणणे मान्य करावे. त्यानंतरच युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होईल. या दोन्ही पर्यायापैकी कुठलाही पर्याय युक्रेनने निवडावा. कारण काहीही झाले तरी रशिया युक्रेनमधील आपला हेतू साध्य केल्याशिवाय राहणार नाही, अशा खरमरीत शब्दात मेदवेदेव्ह यांनी आपल्या देशाचा निर्धार व्यक्त केला. याबरोबरच अमेरिकेने युक्रेनी लष्कराला पुरविलेल्या ‘एचआयएमएआरएस-हिमर्स’ रॉकेट लाँचर्ससारख्या शस्त्रांमुळे रशियाला धोका संभवत नाही, असे मेदवेदेव्ह यांनी स्पष्ट केले. मात्र अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरविली तर मात्र रशियाच्या भूभागाला त्यापासून धोका संभवतो, असे मेदवेदेव्ह यांनी बजावले आहे. याआधी मेदवेदेव्ह यांनी रशियाला असलेला धोका वाढला, तर रशियाच्या विरोधात खडे ठाकलेल्या कुठल्याही देशाची राजधानी सुरक्षित राहू शकणार नाही, असे बजावले होते.

रशियाचे हल्ले

मेदवेदेव्ह यांच्यासह इतर रशियन नेते व वरिष्ठ अधिकारी देखील युक्रेनमधील उद्दिष्टे पूर्ण झाल्याखेरीज लष्करी कारवाई थांबणार नसल्याचे सांगत आहेत. ‘डीनाझीफकेशन ऑफ युक्रेन’ अर्थात युक्रेनला नाझीवाद्यांच्या तावडीतून सोडविणे हा आपल्या लष्करी कारवाईमागचा हेतू असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले होते. त्याची आठवण या निमित्ताने माध्यमे करून देत आहेत. अमेरिकन तसेच युरोपिय देशातील माध्यमे व विश्लेषक देखील युक्रेनमधील राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सरकार उलथविण्याचा रशियाचा कट असल्याचा आरोप करीत आहेत. तर वोलोदोमिर झेलेन्स्की म्हणजे युक्रेनच्या सत्तेवर अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी आणून बसविलेले बाहुले असल्याचा दावा करीत आहे. रशियाच्या विरोधात युक्रेनचा वापर करण्यासाठी कळसूत्री बाहुल्याप्रमाणे झ्ोलेन्स्की यांचा वापर केला जात आहे, असे घणाघाती आरोप याआधी रशियाने केले होते.

या पार्श्वभूमीवर, मेदवेदेव्ह यांनी युक्रेनबाबत दिलेला नवा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. त्यामुळे झेलेन्स्की युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदावर असेपर्यंत युक्रेनचे युद्ध थांबणार नाही, असा संदेशच रशियाकडून दिला जात आहे.

याच कारणामुळे रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची वाताहत झ्ााल्यानंतरही झ्ोलेन्स्की माघार घ्यायला तयार नाहीत. अमेरिका आणि पाश्चिमात्यांना युक्रेन व युक्रेनच्या जनतेशी काहीही देणेघणे नाही. त्यांना केवळ युक्रेनचा रशियाच्या विरोधात वापर करायचा आहे, असे रशिया सातत्याने बजावत आहे. विशेषत: युक्रेनच्या जनतेपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी रशिया मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info