Breaking News

अमेरिका, फ्रान्स व तुर्कीने सिरियातून सैन्य मागे घ्यावे – आक्रमक बनलेल्या सिरियाची मागणी

संयुक्त राष्ट्रसंघ – अमेरिका, फ्रान्स आणि तुर्की या देशांनी सिरियात बेकायदेशीररित्या तैनात केलेले आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी सिरियाचे परराष्ट्रमंत्री ‘वालिद अल-मुअलेम’ यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात सिरियन परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली ही मागणी या देशाची भाषा आक्रमक बनल्याचे दाखवून देत आहे. काही दिवसांपूर्वी सिरियावर सातत्याने हवाई हल्ले चढविणार्‍या इस्रायललाही खरमरीत इशारा दिला होता.

अमेरिका, फ्रान्स व तुर्की, माघार, वालिद अल-मुअलेम, दहशतवाद, संघर्ष, world war 3, सिरिया, इस्रायलसिरियात सुरू झालेला भीषण संघर्ष आठव्या वर्षात पोहोचला आहे. या संघर्षात साडेतीन लाखाहून अधिकजणांचा बळी गेला व विस्थापित झालेल्या कुटुंबांची संख्या लाखोंवर आहे. असे असले तरी आता सिरियातील परिस्थिती बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात आली आहे, असे सांगून अल-मुअलेम यांनी दुसर्‍या देशात वास्तव्य करीत असलेल्या सिरियन नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले. त्याचवेळी सिरियातील दहशतवादविरोधी संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून हा संघर्ष संपण्याच्या स्थितीत आहे, अशी माहिती सिरियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. म्हणूनच सिरियात बेकायदेशीररित्या तैनात असलेल्या अमेरिका, फ्रान्स व तुर्कीच्या सैन्याने इथून माघार घ्यावी, अशी मागणी अल-मुअलेम यांनी केली.

अमेरिका, फ्रान्स व तुर्की, माघार, वालिद अल-मुअलेम, दहशतवाद, संघर्ष, world war 3, सिरिया, इस्रायलसिरियामध्ये अमेरिकेचे सुमारे हजार सैनिक तैनात आहेत. तर फ्रान्सचे हजाराहून अधिक सैनिक सिरियात तैनात असून तुर्कीनेही कुर्दांवरील कारवाईसाठी सिरियात सैन्यतैनाती केल्याचा दावा केला जातो. तर अमेरिकन सैन्य सिरियामध्ये कुर्दांना प्रशिक्षण देत आहे. या सार्‍या परदेशी सैनिकांनी इथून निघून जावे, अशी मागणी करून सिरियन परराष्ट्रमंत्र्यांनी या सैनिकांचे इथले अस्तित्त्व बेकायदेशीर होते, असा टोला लगावला. पाश्‍चिमात्य देशांच्या अपप्रचारामुळे सिरियातील परिस्थिती अजूनही भयावह आहे, असा समज होऊन सिरियन जनता मायदेशी परतण्यास तयार होत नाही, अशी टीका मुअलम यांनी केली.

दरम्यान, सिरियाला सहाय्य करणार्‍या रशियाचे अल-मुअलम यांनी कौतुक करून आभार मानले. सिरियातील रशियाची तैनाती सिरियन सरकारच्या परवानगीने झालेली आहे. त्यामुळे रशियाच्या सिरियातील कारवाया वैध ठरतात, असा दावा दोन्ही देशांकडून केला जातो. त्याचवेळी रशियाने सिरियाला अधिक प्रमाणात सहाय्य करण्याची भूमिका स्वीकारली असून सिरियाच्या काही भागांचे रक्षण रशियन सैनिकच करू लागल्याचे दिसत आहे. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सिरियाची भाषा आक्रमक बनली आहे.

काही दिवसांपूर्वीच सिरियाने आपल्या भूभागात सातत्याने हल्ले चढविणार्‍या इस्रायलला खरमरीत इशारा देऊन यापुढे सिरियावर हल्ला चढवताना दोनवेळा विचार करण्याचे बजावले होते.

सिरियाच्या या आक्रमकतेमागे रशियाचा फार मोठा हात आहे. रशियाने सिरियाला ‘एस-300’ ही आपली प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविली असून ही यंत्रणा सिरियात दाखल झाली आहे. त्याच्या तैनातीनंतर इस्रायलची लढाऊ विमाने सहजतेने सिरियावर हल्ला चढवू शकणार नाहीत, असे दावे केले जात आहेत. रशियाने सिरियाला ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवू नये, असे इस्रायलने रशियाला बजावले होते. पण सिरियात आपले लष्करी विमान पडल्यानंतर, रशिया इस्रायलच्या विरोधात कठोर भूमिका घेऊ लागला असून ‘एस-३००’ यंत्रणा सिरियात धाडून रशियाने इस्रायलला सज्जड इशारा दिल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info