Breaking News

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांबाबतच्या कराराविरोधात बेल्जियममध्ये तीव्र निदर्शने

ब्रुसेल्स  – संयुक्त राष्ट्रसंघाने निर्वासितांसाठी तयार केलेल्या विशेष कराराची प्रक्रिया पार पडली असली तरी त्याविरोधातील असंतोष अजूनही कमी झालेला नाही. युरोपिय महासंघाचे मुख्यालय असलेल्या बेल्जियममध्ये रविवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कराराविरोधात आक्रमक निदर्शने करण्यात आली. बेल्यिजमच्या पंतप्रधानांनी या करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतल्याने देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या ‘एन-व्हीए’ने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

बेल्जियम, निदर्शन, युरोपिय महासंघ, निर्वासित, बहिष्कार, ब्रुसेल्स, ऑस्ट्रियारविवारी बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समध्ये तब्बल साडेपाच हजारांहून अधिक निदर्शकांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कराराविरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी सुरक्षायंत्रणांनी केलेल्या कारवाईत अश्रुधूर तसेच लाठीमार करण्यात आल्याचे समोर आले. सुरक्षायंत्रणांनी शेकडो निदर्शकांना ताब्यात घेतले असून काही पोलिस जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. या निदर्शनांमुळे बेल्जियममधील वातावरण ढवळून निघाले असून नजिकच्या काळात ही निदर्शने अधिक तीव्र होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाने निर्वासितांसाठी तयार केलेल्या करारावर १९३ सदस्य देशांपैकी फक्त १६४ देशांनीच स्वाक्षर्‍या केल्या आहेत. कराराला विरोध करणार्‍या देशांमध्ये अमेरिका व इस्रायलसह १० युरोपिय देशांचा समावेश आहे. एकीकडे महासंघ निर्वासितांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करीत असतानाच सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय कराराला केलेला विरोध महासंघाला मोठा धक्का ठरला आहे. बेल्जियम महासंघातील आघाडीचा देश असून ब्रुसेल्समध्ये महासंघाचे मुख्यालयही आहे. त्यामुळे बेल्जियममधील या निदर्शनांना फार मोठे राजकीय महत्त्व आले आहे.

गेल्याच आठवड्यात महासंघाच्या प्रमुख सदस्य देशांनी ऑस्ट्रियाकडून आयोजित करण्यात आलेल्या निर्वासितांबाबतच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे समोर आले होते. ऑस्ट्रियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या कराराला दिलेला नकार हे त्यामागील प्रमुख कारण ठरले होते. त्यापाठोपाठ बेल्जियममध्ये झालेली तीव्र निदर्शने, निर्वासितांच्या समस्येमुळे महासंघात पडलेली फूट अधिकच तीव्र करणारी दिसत आहे.

हिंदी    English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info