Breaking News

चीनचे ‘डार्क मून मिशन’ अंतराळयुद्धातील महत्त्वाचा टप्पा – अमेरिकी विश्‍लेषकांचा इशारा

बर्लिन – गेल्या आठवड्यात चीनने चंद्राच्या अज्ञात अशा ‘डार्क साईड’वर पाठविलेले अवकाशयान, अंतराळयुद्धातील महत्त्वाचा टप्पा असल्याचा दावा अमेरिकेतील अधिकारी व विश्‍लेषकांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून काम केलेल्या बॉब वॉकर यांनी, चीनचे ‘डार्क मून मिशन’ म्हणजे चंद्राचा लष्करीदृष्ट्या वापर करण्याच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब असल्याचा खळबळजनक इशारा दिला आहे. चंद्रावरील चीनची नवी मोहीम म्हणजे अमेरिकेसह इतर प्रगत देशांना अंतराळक्षेत्रात पिछाडीवर सोडण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही अमेरिकी तज्ज्ञांनी केला.

गुरुवारी ३ जानेवारीला चीनचे ‘चँग ४’ हे अवकाशयान चंद्राची अज्ञात बाजू म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘डार्क साईड’वर उतरले होते. चंद्राच्या या अज्ञात बाजूवर यशस्वीरित्या उतरणारे हे जगातील पहिले यान ठरले असून अशी कामगिरी करणारा चीन पहिला देश बनला आहे. चीनची चंद्रावरील ही मोहीम म्हणजे आम्ही पाश्‍चात्य देशांना अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात मागे टाकून आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत आहेत, अशा शब्दात चीनचे प्राध्यापक ‘होऊ शियुन’ यांनी अंतराळमोहीमेचे महत्त्व अधोरेखित केले.

‘डार्क मून मिशन’, अंतराळयुद्ध, बॉब वॉकर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, लष्करी कारवाया, ww3, चीन, मायकल पिल्सबरीचीन सरकार, अंतराळ संस्था व या क्षेत्रातील तज्ज्ञ या कामगिरीबद्दल पाठ थोपटून घेत असतानाच अमेरिकेने मात्र यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमाबाबत गंभीर इशारा दिला होता. ‘चीनचा अवकाश कार्यक्रम अंतराळक्षेत्राला आधुनिक युद्धाचा केंद्रबिंदू बनविण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे’, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आपल्या इशार्‍यात म्हंटले होते. आता अमेरिकेतील इतर अधिकारी व तज्ज्ञही चीनच्या अंतराळ कार्यक्रमाकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे बजावत आहेत.

‘चीनचा अंतराळ कार्यक्रम म्हणजे केवळ अंतराळक्षेत्रातील प्रगतीचा भाग नसून संपूर्ण देशाला पुढे नेण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा आहे. चीन यापुढे चंद्राचा वापर लष्करी कारवायांसाठी करु शकतो, असे स्पष्ट संकेत गेल्या आठवड्यातील महत्त्वाकांक्षी मोहिमेने दिले आहेत. चीनचे लष्कर अंतराळक्षेत्रात जे काही करते आहे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, हे लक्षात ठेवायला हवे’, अशा शब्दात ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून काम केलेल्या बॉब वॉकर यांनी ‘डार्क मून मिशन’कडे लक्ष वेधले.

अमेरिकेतील प्रमुख अभ्यासगट ‘हेरिटेज फाऊंडेशन’मधील वरिष्ठ संशोधक डीन चेंग यांनी स्पष्ट शब्दात, अंतराळक्षेत्रात अमेरिका चीनच्या मागे पडल्याचे दिसून येते, असे बजावले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सल्लागार मायकल पिल्सबरी यांनी, अमेरिकेसह पाश्‍चात्य जगताने चीनच्या अंतराळक्षेत्रातील महत्त्वाकांक्षांकडे दुर्लक्ष केले आहे व त्याचे परिणाम नजिकच्या काळात दिसतील, अशा शब्दात फटकारले आहे.

 English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info