सौदीच्या दोन विमानतळांवर हौथी बंडखोरांचे पुन्हा ड्रोन हल्ले

सौदीच्या दोन विमानतळांवर हौथी बंडखोरांचे पुन्हा ड्रोन हल्ले

कैरो – सौदी अरेबियाच्या कारवाईला न जुमानता येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदीतील विमानतळांवरील ड्रोन हल्ले सुरू ठेवले आहेत. काही तासांपूर्वी हौथी बंडखोरांनी सौदीच्या जिझान आणि अभा या दोन विमानतळांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले चढविल्याचा दावा हौथीसंलग्न वृत्तवाहिनीने केला. तर सौदीच्या हवाईसुरक्षा यंत्रणेने हौथी बंडखोरांचे ड्रोन हल्ले उधळल्याचा दावा केला आहे.

हौथी बंडखोर, ड्रोन हल्ले, अभा, जिझान, विमानतळ, चिथावणी, ww3, सौदी, युरोपिय महासंघ

हौथी बंडखोरांकडून सातत्याने ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे अभा तसेच जिझान विमानतळांना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, सौदीच्या सुरक्षा यंत्रणांनी या दोन्ही विमानतळांवरील सेवा पुढील काही दिवसांपर्यंत बंद केली आहे. त्यामुळे गेले काही दिवस या विमानतळांवर शुकशुकाट असल्याचे बोलले जाते. यानंतरही शनिवारी हौथी बंडखोरांनी या दोन्ही विमानतळांवर ड्रोन हल्ले चढविले. या हल्ल्यात या विमानतळांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो.

हौथी बंडखोरांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे सौदीला या हल्ल्यांची चिथावणी दिली. ‘येमेनविरोधात सौदीची आक्रमकता आणि येमेनला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असेपर्यंत आपल्याकडून सौदीच्या राजवटीवर असे हल्ले सुरूच राहतील’, अशी धमकी हौथी बंडखोरांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्विट केले. गेल्या आठवड्याभरात हौथी बंडखोरांनी सौदीच्या विमानतळांवर केलेला हा पाचवा हल्ला होता. यापैकी अभा विमानतळावरील या तिसरा हल्ला ठरतो.

हौथी बंडखोरांच्या या हल्ल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या हल्ल्याची तीव्र निंदा करताना या हल्ल्याने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे बजावले. तर युरोपिय महासंघाने विमानतळावरील क्षेपणास्त्र हल्ला ही अस्वीकारार्ह चिथावणी असल्याची टीका केली होती. दरम्यान, सौदीत एकामागोमाग एक झालेल्या हल्ल्यांनी इराणसंलग्न हौथी बंडखोरांची ताकद वाढल्याचे दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info